तरुण भारत

रेमडेसिवीरच्या साठेबाजांवर कडक कारवाई : गृहराज्यमंत्री

प्रतिनिधी/सांगली

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रूग्ण मोठयासंख्येने वाढत चालले आहेत. कोरोनावर हमखास उपाय असणाऱया रेमडेसिवीर या इंजेक्शनचा कोणी साठा केला तर त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. तसेच राज्यसरकार कोणालाही घाबरत नाही. तसेच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टी माफ केल्या जाणार नाहीत. विरोधकांनी राज्याला अडचणीत आणणाऱया कोणत्याही गोष्टी करू नयेत, असेही त्यांनी सांगितले.

Advertisements

 कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्याचा संचारबंदीचा आढावा जिल्हा पोलीस मुख्यालयात घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आणखीन कडक निर्बंध करणार आहे. त्याच्यावर अद्यापही शिक्कामोर्तब झाले नाही. परंतु हे जरी कडक निर्बंध लागू केले तरीसुध्दा या निर्बंधाची अंमलबजावणी पोलिस दलाकडून तात्काळ करण्यात येणार आहे. त्यासाठीचा ऍक्शन प्लॅनही तयार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन पुरवठÎासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही ठिकाणी रेमडिसिव्हरचा काळाबाजार किंवा साठवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे. याकाळात या इंजेक्शनची गरज असून त्याचा साठा करणाऱयांवर कडक कारवाई केली जाईल. तो साठा जप्त करून गरजूंना तातडीने देण्यात येईल.

 राज्यात सध्या 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी सर्वत्र पोलिस दलाकडून केली जात आहे. कोणत्याही क्षणी शासन कडक निर्बंध लागू करेल. यासाठी पोलिस बंदोबस्त, नाकेबंदीसह सर्व तयारी पूर्ण झाली आहे. याकाळत पोलिसांचा थेट जनतेशी संबंध येत असल्याने कर्मचाऱयांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जाणार आहे. 50 वर्षावरील कर्मचाऱयांना कार्यालयीन कामच दिले जाईल. याशिवाय कर्मचाऱयांच्या कुटुंबियांचीही आरोग्य तपासणी केली जात आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलिस वेलफेअर फंडामधून अधिकाऱयांना छावणीच्या ठिकाणी फुड पॅकेट, पाणी, प्राथमिक आरोग्याच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. यावेळी पोलिस अधीक्षक दीक्षीत गेडाम, अपर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले, पोलिस उपाधीक्षक किशोर काळे, कृष्णांत पिंगळे, अश्विनी शेंडगे, अंकुश इंगळे, अशोक वीरकर, रत्नाकर नवले, अजित टिके, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड उपस्थित होते.

संभाजीराव भिडेंच्या त्या विधानाची तपासणीनंतर कारवाई

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी कोरोना हा मानसिक रोग असल्याचे खळबळजनक विधान केले होते. यावर राज्यमंत्री देसाई म्हणाले, संभाजीराव भिडे यांनी केलेल्या विधानाची व्हिडिओ क्लिप मिळवून त्याची तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई करणे योग्य ठरणार आहे.

 त्या मोर्चातील सर्वावर गुन्हे दाखल होणार

मिनी लॉकडाऊनच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर जो व्यापाऱयांनी मोर्चा काढला होता. त्या मोर्चामध्ये सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडाला होता. तसेच अनेक राजकीय नेते यामध्ये होते. पण या मोर्चाच्या फक्त संयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतरांवर कधी गुन्हे दाखल होणार याबाबत मंत्री देसाई यांना विचारले असता त्यांच्यावरही लवकरच कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

जलसमाधी परिक्रमा यात्रा: नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप

Abhijeet Shinde

रामपूर येथे दुचाकीवरून पडल्याने एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

साळशिंगे रस्त्यावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक

Abhijeet Shinde

साळमाळगेवाडीत दूध व्यावसायिक तरुणाचा गळा चिरून खून

Abhijeet Shinde

ना चांगभल, ना गुलाल-खोबरं; भाविकांशिवाय खरसुंडी यात्रेत फक्त धार्मिक विधी

Abhijeet Shinde

पूर परिस्थितीत महाराष्ट्र-कर्नाटक राज्यात समन्वय राहील – जयंत पाटील

Abhijeet Shinde
error: Content is protected !!