तरुण भारत

सोलापूर शहरात 338 तर ग्रामीण भागात 1111 नवे कोरोना रूग्ण

– एकाच दिवशी जिह्यात 40 जणांचा मृत्यू

प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

सोलापूर शहरात बुधवारी 338 तर ग्रामीण भागात 1111 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्हात एकाच दिवशी 40 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.

जिल्हातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज बुधवारी नवे कोरोनाबाधित 1111 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू तर 911 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 1111 पैकी 685 पुरुष, 426 स्त्रियांचा समावेश आहे. आतापर्यंत 1451 जणांचा मृत्यू झाला आहे. जिह्यातील ग्रामीण भागात एकूण 61 हजार 221 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 7937 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 10593 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 9482 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 1111 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1451 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 51 हजार 833 जण बरे होऊन घरी गेली आहेत. सोलापूर शहरात नव्याने 338 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 332 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने 22 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. सोलापुर शहरात 2535 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 338 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2197 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 338 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 202 पुरुष तर 136  स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 हजार 690  झाली आहे.

Related Stories

सोलापूर : इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही कोरोना लस मोफत द्या- ॲड रेवण भोसले

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 188 नवे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

बार्शीतील बावी येथे कमानीचे काम सुरू असताना अपघात, तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : विठ्ठल मंदिर परिसरात बॉम्ब : दुकाने बंद, घबराटीचे वातावरण

Abhijeet Shinde

सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अखेर कर्नाटकात गजाआड

Sumit Tambekar

अक्कलकोटच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला आयएएस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!