तरुण भारत

कराडमध्ये प्रभागनिहाय लसीकरण केंद्र बंद

यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात मध्यवर्ती केंद्र सुरू; स्टाफ, लस पुरेशी नसल्याने पालिकेचा निर्णय

प्रतिनिधी / कराड

Advertisements

शहरातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने पाच ठिकाणी प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू केली होती. मात्र लशीचा अपुरा साठा, डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱयांची अनुपलब्धता व लसीकरण केंद्रांवर डॉक्टरांची उपस्थिती आवश्यक असल्याने गुरूवारी प्रभागनिहाय केंद्र बंद करण्यात आली. याऐवजी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये मध्यवर्ती लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. याशिवाय पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू राहणार आहे.

शहरात लसीकरण वेगाने करण्यासाठी पालिकेने ही मोहीम गतीने राबवली होती. त्यासाठी पत्रकार भवन, खराडे कॉलनी, मुख्याधिकारी निवास, सोमवार पेठ शाळा क्रमांक 4, शाळा क्रमांक 9, शाळा क्रमांक 3, रविवार पेठ पाण्याची टाकी, नागरी आरोग्य केंद्र अशा ठिकाणी लसीकरण केंद्र उघडण्यात आली होती. यातील काही केंद्र प्रतिसाद कमी झाल्यानंतर बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत 6 ठिकाणी लसीकरण सुरू होते. प्रभागनिहाय लसीकरणाची जबाबदारी डॉ. दिलीप सोलंकी यांच्याकडे होती. मात्र लसीकरणाच्या ठिकाणी नगरसेवकांनी फलक लावल्याने वाद निर्माण झाला होता. शहर काँग्रेसने यावर आक्षेपही घेतला होता.

दरम्यान, शाळा क्रमांक तीनमध्ये बुधवारी एका महिलेला लस दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली होती. या केंद्रावर डॉ. दिलीप सोलंकी उपस्थित होते. त्यांनी तातडीने उपचार केल्याने त्या महिलेस जीवदान मिळाले. त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र तितके डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने प्रभागनिहाय लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच पालिकेला पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने त्यावरूनही ओढाताण होत आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात मध्यवर्ती केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी गर्दी झाली तरी लोकांना बसण्याची सोय असून इतर सुविधाही आहेत. त्यामुळे येथे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. येथे डॉ. दिलीप सोलंकी हे उपलब्ध असणार आहेत. तर नागरी आरोग्य केंद्रात डॉ. शीतल कुलकर्णी या काम पाहात आहेत. या दोन डॉक्टरांच्या उपस्थितीत ही दोन केंद्र सुरू राहणार असून अन्य केंद तुर्तास बंद करण्यात आली आहेत.पुरेसा लस साठा आणि स्टाफ उपलब्ध झाल्यानंतर अन्य केंद्रांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

Related Stories

आणि शाळेचा घंटा खणाणली

Omkar B

वृक्षारोपणसाठी मुळपीठ डोंगरावर 100 खड्डे तयार!

Patil_p

कृषी कायद्याविरोधात रहिमतपूर बंद

Patil_p

सातारा : चारा छावण्यांची रखडलेली बिले तातडीने द्या – रणजितसिंह देशमुख

Abhijeet Shinde

धुमाळप्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढणार

Amit Kulkarni

रहिमतपूर येथे वानराचा झाडावरून पडल्याने मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!