तरुण भारत

जनतेने राजकीय महामारीतून राज्याला मुक्त करावे

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे आवाहन : मताधिकार वापरून डोस द्यावेत

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

कोविडच्या महामारीला आम्ही सामोरे जात असताना डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री बनल्यापासून कोळसा वाहतूक, म्हादई प्रश्न, वन क्षेत्राची कत्तल, राजकीय पक्षांतरे अशा घडामोडींमुळे आम्ही गोमंतकीय राजकीय महामारीला सामोरे जात आले आहेत. यातून मुक्ती मिळविण्यासाठी आम्हाला कोविडसाठी जशी लस घ्यावी लागते तशी लस वापरावी लागेल आणि ही लस म्हणजे लोकांच्या हातात असलेला मताधिकार आहे. त्याचा योग्य प्रकारे वापर करून जनतेने राजकीय महामारीतून राज्याला मुक्त करावे. सध्या लस जशी दोन डोसांमध्ये घ्यावी लागत आहे तशाच प्रकारे राजकीय महामारीतून मुक्त होण्यासाठी दोनपैकी पहिला डोस पालिका निवडणुकीत, तर दुसरा डोस विधानसभा निवडणुकीत देणे आवश्यक आहे, असे परखड मत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

यापूर्वी आम्ही जी जी आश्वासने दिली ती आम्ही पूर्ण करून दाखविली आहेत. भविष्यासाठी सज्ज फातोर्डा हे जे आम्ही आश्वासन दिले आहे तेही आम्ही पूर्ण करू. त्यासाठी फातोर्डाच्या मतदारांनी गोवा फॉरवर्डने उभ्या केलेल्या फातोर्डा फॉरवर्डच्या उमेदवारासाठी भरघोस मतदान करावे, असे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी येणाऱया सर्व मतदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करताना त्यांनी मतदारांसाठी गोवा फॉरवर्ड मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले आहे. आमच्या पॅनलच्या 13 ही उमेदवारांनी फातोर्डावासियांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांची काम करण्याची धडपड आणि तळमळ यांना लोक पाठिंबा देणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचे कर्तृत्व, तळमळ आणि विश्वासार्हता पाहून आणि हे काही तरी करून दाखवू शकतील हे माहीत असल्यामुळेच मतदार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. सध्याचे गोमंतकीयविरोधी भाजप सरकार सत्ताभ्रष्ट करण्यासाठी जी टीम गोवा ही संकल्पना पुढे आली आहे त्याचे ते घटक असून गोवेकारांना हवे असलेले निर्णय घेणारे सरकार आणण्यासाठी जी मोहीम सुरू करण्यात आली आहे त्याच्याच ते भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या राज्यात जी कोविड परिस्थिती उद्भवली आहे तिचा आपण बारकाईने ठाव घेत आहे. मागच्या लॉकडाऊनच्या वेळी गोवा फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन लोकांना मदत केली तशीच मदत आताही तशी वेळ आल्यास करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Related Stories

मुक्तीनंतरची गोव्याची प्रगती प्रशंसनीय

Patil_p

आलेक्स रेजिनाल्ड यांचा तृणमूल काँग्रेसला दणका

Amit Kulkarni

आमदारांच्या राजीनाम्याची मालिका सुरुच

Amit Kulkarni

फोंडा शहराच्या बाहय़ विकास आराखडय़ावर नागरिकांच्या सुचना

Amit Kulkarni

मुलांमधली निरागसता जपायला हवी : दिग्दर्शक हिमांशू सिंग

Abhijeet Shinde

मार्ग अभियानचे संस्थापक स्वातंत्र्यसैनानी गुरूनाथ केळेकर काळाच्या पडदय़ाआड

Amit Kulkarni
error: Content is protected !!