तरुण भारत

धोका वाढला : महाराष्ट्रात मागील 24 तासात 67,013 नवे रुग्ण; 568 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यातील दैनंदिन आकडे धडकी भरवणारे ठरले आहेत. दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 67 हजार 013 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 62 हजार 298 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा वाढता आकडा ही चिंतेची बाब ठरली असून काल कोरोनामुळे 568 जणांनी आपला जीव गमावला आहे.

Advertisements


गेल्या 24 तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या 40 लाख 94 हजार 840 वर पोहोचली आहे. त्यातील 33,30, 747 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.34 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.53 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 99 हजार 858 रुग्ण उपचार घेत आहेत.

 
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 48 लाख 95 हजार 986 नमुन्यांपैकी 16.45 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 39 लाख 71 हजार 917 क्वारंटाईनमध्ये असून, 29 हजार 014 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

  • पुण्यात जिल्ह्यात 9,841 नवे रुग्ण


पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात 9 हजार 841 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 115 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात 9,186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7 लाख 63 हजार 194 वर पोहोचली आहे. यातील 6,49,565 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत 1 लाख 1 हजार 916 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 11,882 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

सलून व्यवसाय सुरु करणेस परवानगी द्या : खासदार धैर्यशील माने

Abhijeet Shinde

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघचा दरारा निर्माण व्हायला हवा: मुख्यमंत्री ठाकरे

Abhijeet Shinde

विरंगुळा हॉटेल जवळील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

Abhijeet Shinde

सांगली : १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध दराबाबत आंदोलन, दूधसंघांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Abhijeet Shinde

कारवाईच्या भितीने एसटी चालकाची आत्महत्या

Sumit Tambekar

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी

Rohan_P
error: Content is protected !!