तरुण भारत

विमा कंपन्यांकडून मिळणार कॅशलेस उपचार सुविधा

इरडाचा मोठा निर्णय – विमा कंपन्यांच्या अधिकारातील रुग्णालयातच सेवा होणार उपलब्ध

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

देशात आता विक्रमी पातळीवर कोरोना संसर्गाची वाढ होताना पहावयास मिळत आहे. यामुळे विविध उद्योगधंदे, व्यवसाय, आर्थिकसह अन्य आरोग्य क्षेत्रात बदल केले जात आहेत. इन्शुरन्स रेग्युलेटर इरडा (आयआरडीएआय) यांनी इन्शुरन्स कंपन्यांना आपल्या ग्राहकांसाठी काही रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा सुरू करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये इरडाच्या अंतर्गत येणाऱया रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध होणार असल्याचेही इरडाने सांगितले आहे.

या सुविधेमध्ये कोरोनासाठीही उपचार करता येणार असून अन्य आजारांसंदर्भातही हा निर्णय घेतला होणार असल्याचे संकेत आहेत. या निर्णयामुळे   ज्या लोकांकडे आरोग्य विमा असणार आहे, त्यांनाही या सुविधेच्या माध्यमातून कोरोनाचा उपचार कॅशलेस स्वरूपात करता येणार असल्याची माहिती आहे.

रुग्णालयाने मान्य न केल्यास कारवाई

सरकारनेही या निर्णयाचे स्वागत केले असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 एप्रिल रोजी इरडाचे अध्यक्ष एस. सी खुंटिया यांना इन्शुरन्स कंपन्यांकडून कॅशलेस सुविधा देण्यात येणाऱया तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याचा हा सकारात्मक बदल असल्याचे म्हटले जात आहे.

9 लाखापेक्षा अधिकचे क्लेम निकालात

मागच्या वर्षी मार्चमध्ये कोरोनासाठी व्यापक आरोग्य विम्यांचा समावेश केला आहे. कॅशलेस उपचार सुविधा असणाऱया रुग्णालयासोबत अन्य रुग्णालयामध्येही ही सेवा सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितल्या प्रमाणे विमा कंपन्यांनी 8,642 कोटी रुपये कोविडशी संबंधीत 9 लाखापेक्षा अधिकचे क्लेम निकालात काढले असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

स्विगीच्या कर्मचाऱयांना कामामध्ये सवलत

Amit Kulkarni

डेमलरचा ट्रक्टर-टेलर दाखल

Patil_p

डिसेंबरमध्ये इंधन विक्री 1.84 कोटी टनावर

Patil_p

…‘तो’ बॉस पुन्हा परतला!

Amit Kulkarni

इंटरनेटच्या स्पीड वाढीसाठी जिओचे मेश राउटर

Patil_p

ऍपलचे बाजारमूल्य दोन ट्रिलियन डॉलरच्या घरात

Patil_p
error: Content is protected !!