तरुण भारत

कोरोनाचे 12 बळी, 1420 नवे बाधित

प्रतिनिधी / पणजी

गेल्या 24 तासात म्हणजे शुक्रवारी कोरोनाच्या बळींमध्ये घट झाली असून एकूण 12 जणांनी प्राण गमावल्यामुळे किंचित दिलासा मिळाला असला तरी 1420 जण नवीन रुग्ण सापडल्याने संसर्ग कायम राहिला आहे. कांदोळी आरोग्य केंद्राने कोरोना रुग्णांचा 1000 आकडा गाठला असून मडगावच्या केंद्राने त्यापुढे मजल मारीत 1126 रुग्ण नोंदवले आहेत. एकूण मृतांची संख्या 976 वर पोहोचली असून सक्रिय कोरोना रुग्ण 11000 च्या पुढे जाऊन 11040 झाले आहेत. संशयित रुग्ण म्हणून 146 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 703 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.

Advertisements

 दिवसभरात 596 जण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत मिळून एकूण 73644 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 61628 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. पर्वरी आरोग्य केंद्रात 942 रुग्णांची नोंद झाली असून तेथील आकडा 1000 च्या पल्ल्याकडे आगेकूच करीत असल्याची चिन्हे दिसत आहेत. म्हापसा, पणजी, कुठ्ठाळ्ळी, वास्को या आरोग्य केंद्रातील रुग्णांची संख्या यापूर्वीच 600 च्या पार झाली आहे.

विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

डिचोली 238, सांखळी 302, पेडणे 224, वाळपई 173, म्हापसा 655, हळदोणा 197, बेतकी 78, कांदोळी 1000, कासारवर्णे 69, कोलवाळ 216, खोर्ली 208, चिंबल 383, शिवोली 332, पर्वरी 942, मये 81, कुडचडे 200, काणकोण 190, मडगाव 1166 वास्को 693, बाळ्ळी 208, कासावली 337, चिंचणी 146, कुठ्ठाळी 630, कुडतरी 172, लोटली 173, मडकई 117, केपे 131, सांगे 113, शिरोडा 129, धारबांदोडा 125, फोंडा 543, नावेली 169. नवीन कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी न होता वाढत असून जनतेत भीती कायम आहे. गोव्यात विविध मार्गाने आलेले 15 प्रवासी कोरोनाबाधित झाले आहेत.

Related Stories

मलेशियन लिरीडॉन क्रासनिकी ओडिशा एफसी संघाशी करारबद्ध

Amit Kulkarni

14 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Patil_p

विठ्ठलदास पै काकोडे यांचे निधन

Amit Kulkarni

म्हापसा बाजारपेठे अध्यक्षपदी विराज फडके यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

मडगाव पालिकेच्या रोजंदारीवरील कामगारांचा कामावर बहिष्कार

Omkar B

दिवाडीतील बांधाच्या भगदाडाचे बांधकाम

Amit Kulkarni
error: Content is protected !!