तरुण भारत

चापगाव येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रतिसाद

अडीचशेहून अधिक जणांनी घेतली लस : आरोग्य खात्याकडून लसीकरण शिबिराचे आयोजन

वार्ताहर / चापगाव

Advertisements

सर्वत्र कोरोना संक्रमणाचा वाढता प्रभाव लक्षात घेता आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस अत्यावश्यक असल्याने गरजेचे बनले आहे. त्यामुळे चापगाव व परिसरातील गावातील 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीकरण मोहीम शुक्रवारी राबवण्यात आली. येथील मराठी व कन्नड शाळेच्या प्रांगणात आयोजित या लसीकरणाला चापगाव ग्राम पंचायतीसह परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या लसीकरण अभियानात जवळपास दोनशेहून अधिक जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

यावेळी चापगाव ग्राम पंचायत उपाध्यक्ष मारुती चोपडे, माजी सभापती सयाजी पाटील, ग्रा. पं. सदस्य नजीर सनदी, सामाजिक कार्यकर्ते हणमंत मादार, नारायण गोदी, अनिल बेळगावकर, पत्रकार पिराजी कुऱहाडे, ग्राम पंचायत विकास अधिकारी नागाप्पा बन्नी यासह अनेकजण उपस्थित होते. या लसीकरण अभियानात चापगाव ग्रा. पं.तील चापगावसह अलेहोळ, वड्डेबैल, शिवोली तसेच कारलगा येथील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. या अभियानात 45 वर्षावरील सर्व वयोवृद्ध नागरिकांना लसीकरण देण्यात आले. शिवाय या मोहिमेमध्ये अनेक जणांनी दुसरा डोसही घेतला. यासाठी पारिश्वाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य खात्याने सदर लसीकरण मोहीम राबवल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.

कोरोना संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेता चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील 45 वर्षावरील सर्वांना कोरोना लसीकरण मोहीम ग्रामपंचायतीने राबवावी, अशी मागणी जोर धरला होती. अनेकांनी गेल्या पंधरवडय़ात पारिश्वाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी जाऊन पहिला डोस घेतला. परंतु सर्वांनाच त्या ठिकाणी जाणे शक्मय नसल्याने गावातच अभियानात राबवण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष रमेश धबालेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला केली होती. या ठिकाणी अभियान राबविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी संजय नांदे यांची भेट घेऊन या लसीकरणासाठी चापगाव ग्रा.पं. क्षेत्रांमधील गावांची निवड करण्याची मागणीदेखील चार दिवसापूर्वी केली होती. याची दखल घेऊन आरोग्य अधिकारी संजय नांदे त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी चापगाव येथे अभियान राबविण्यात
आले.

कोरोना चाचणीला ग्रामस्थांचा विरोध

 या लसीकरण मोहिमेमध्ये नागरिकांतून शंभर टक्के प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. आरोग्य खात्याने जवळपास 300 हून अधिक लसीकरणाची व्यवस्था केली होती. पण बहुतांश नागरिकांनी लसीकरण करून घेण्याकडे पाठ फिरवल्याचे यावेळी दिसून आले. या लसीकरण मोहिमेवेळी कोरोना टेस्ट करण्याचा प्रयत्न आरोग्य खात्याच्यावतीने करण्यात आला. परंतु या कोरोना टेस्टला नागरिकांनी विरोध दर्शवला.

Related Stories

पशुसंगोपन दवाखान्यामध्ये अधिकाऱयांचा मनमानी कारभार

Amit Kulkarni

लोंढा वन अधिकाऱयाकडून बाबुराव देसाईंना पिस्तूलचा धाक

Amit Kulkarni

पथदिपांचे बिल झाले कॅन्टोन्मेंटला डोईजड

Patil_p

नियमांचे पालन न केल्यास कामे करू नका

Patil_p

वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे रॅली

Patil_p

प्रवासी गेले ‘तेल’ लावत

Patil_p
error: Content is protected !!