तरुण भारत

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरासह मालमत्तांवर सीबीआयचा छापा

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयने छापा टाकला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या विरोधात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तसेच मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. 

Advertisements


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला आहे. 

 
दरम्यान अनिल देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने तपास सुरू केला आहे. 
सीबीआयने याआधी अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक, निलंबित अधिकारी सचिन वाझेंचे दोन चालक, बार मालक आदींची चौकशी केली आहे. 

Related Stories

ना सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला; भाजपचा नाना पटोलेंना टोला

Abhijeet Shinde

साताऱ्यात आज ४८ डिस्चार्ज तर ५२३ नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

उद्योगांचा कोविडविषयक टास्क फोर्स

Abhijeet Shinde

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेवर हल्ला; दोन शिक्षकांचा मृत्यू

Abhijeet Shinde

Maratha Reservation : राज्याचं शिष्ठमंडळ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीला

Abhijeet Shinde

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 25 लाखाचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!