तरुण भारत

नकारात्मक प्रतिमेमुळे झाले होते दुःखी

अभिनेत्री नुसरत भरुचाने मांडली व्यथा

अभिनेता नुसरत भरुचाला ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाद्वारे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पण या चित्रपटानंतर मला टीकेलाही तोंड द्यावे लागले होते. लोक तेव्हा माझा द्वेष करत होते, यामुळे मी प्रचंड दुःखावले गेले होते असे नुसरतने एका मुलाखतीत म्हटले आहे.

Advertisements

प्यार का पंचनामा 1 आणि 2 नंतर लोक माझा द्वेष करू लागले होते. चित्रपटात ज्याप्रकारची भूमिका मी साकारली आहे, प्रत्यक्ष जीवनात देखील मी तशीच असल्याचे लोक मानू लागले होते. चित्रपटातील भूमिका मी अत्यंत उत्तम प्रकारे पार पाडली होती. तेव्हा लोकांनी माझ्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून केवळ माझी प्रतिमा आणि माझ्या व्यक्तिरेखेचे आकलन केल्याचे ती सांगते.

ही गुणवत्ता नसून प्रत्यक्ष जीवनातही ही मुलगी तशीच असल्याचे लोक माझ्याबद्दल बोलत होते. एखाद्या प्रतिमेतून बाहेर पडणे सर्वात आव्हानात्मक काम असते असे नुसरतने म्हटले आहे. दिग्दर्शक लव रंजन यांचा ‘प्यार का पंचनामा’ हा रोमांटिक कॉमेडीपट आहे. 2011 मध्ये प्रदर्शित या चित्रपटात नुसरतसह कार्तिक आर्यन, दिव्येंदु शर्मा, सोनाली सहगल, इशिता, राज शर्मा मुख्य भूमिकेत दिसून आले होते. यानंतर नुसरतने 2018 मध्ये प्रदर्शित ‘सोनू के टीटू की स्वीटी’मध्येही नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली होती.

Related Stories

अभिनेत्री रेखा यांच्या गाण्यावर धनश्रीची दिलखेचक अदाकारी

Patil_p

वडील -मुलाच्या नात्याला अधोरेखित करणारा पोरगं मजेतय

Patil_p

टीका ही कमजोरी नव्हे : आलिया

Patil_p

एम्बर हर्डला सरोगसीद्वारे मातृत्व

Patil_p

डॅनियल क्रेग नौदलात मानद कमांडर

Patil_p

‘हिंग पुस्तक तलवार’चा हास्यकल्लोळ आता जगभर

Patil_p
error: Content is protected !!