तरुण भारत

राशिभविष्य

रविवार दि.25 एप्रिल ते शनिवार दि.1 मे 2021

मेष

Advertisements

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-हर्षल युती होत आहे. धंद्यात जम बसेल. मोठे कंत्राट मिळविता येईल. ओळखी वाढल्यामुळे अनेक कामे करून घेता येतील. शेतकरी वर्गाला फायदा होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. घर, जमीन, खरेदी, विक्री करता येईल. संसारात चांगली घटना उत्साह वाढवेल. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर नावलौकिक होईल.

वृषभ

या सप्ताहात तुमच्या राशीत बुधप्रवेश, चंद्र-गुरु त्रिकोण योग होत आहे. न चिडता नम्रपणे तुम्ही वागल्यास कामे करून घेण्यात अडचणी कमी येतील. कायदा पाळा. भांडण वाढवू नका. धंद्यात हिशोब चुकेल. सावध रहा. समोरच्या व्यक्तीच्या मनातील डाव ओळखा. नोकरीत काम वाढेल. स्पर्धा जिंकणे कठीण आहे. राजकीय, सामाजिक कार्यात शब्द जपून वापरा.

मिथुन

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, चंद्र-गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात वाढ होईल. चर्चा संयमाने करा. वसुली करून घ्या. नोकरीतील किचकट कामे मागे ठेवू नका. संसारातील समस्या कमी होईल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. शेतकरीवर्गाला दिलासा मिळेल. मालाची विक्री लाभदायक ठरेल.

कर्क

 या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-हर्षल युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. धंद्यात काम मिळेल. वसुली करून घ्या. प्रवासात घाई करू नका. पोटाची काळजी घ्या. संसारात आप्तेष्टांना मदत करण्यात वेळ जाईल. घरासंबंधी प्रश्न सोडवा. गुंतवणूक योग्य ठिकाणी करा. राजकीय, सामाजिक कार्यात जवळचे लोक मदत करतील. प्रति÷ा सांभाळता येईल.

सिंह

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचा प्रभाव वाढेल. विरोधक मैत्री करतील. संसारातील तणाव कमी होईल. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येईल. धंद्यात सुधारणा होईल. थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यातील किचकट कामे वेळीच पूर्ण करा. आरोप दूर होतील.

कन्या

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, चंद्र-मंगळ प्रतियुती होत आहे. मनावर दडपण असले तरी आत्मविश्वास टिकवून ठेवता येईल. खाण्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. धंद्यात नमते धोरण ठेवा. मोह जास्त ठेवू नका. नोकरी टिकवा. संसारात खर्च वाढेल. गैरसमज होईल. राजकीय, सामाजिक कार्यात उतावळेपणाने कोणतेही विधान करणे टाळा. नम्रता ठेवा.

तूळ

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-हर्षल युती होत आहे. धंद्यात जम बसवा. थकबाकी वसूल करा. सप्ताहाच्या सुरुवातीला कायदा पाळा. प्रवासात घाई करू नका. घरातील समस्या कमी होईल. राहून गेलेली कामे करून घ्या. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. तुमचे महत्त्व वाढेल. स्पर्धेत जिंकाल. अभ्यासात पुढे जाल.

वृश्चिक

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. धंद्यात गैरसमज होईल. तुमच्यावर आरोप घेतला जाईल. तुमचा राग वाढेल अशी कृती समोरची व्यक्ती करेल. नोकरीत अडचणी येतील. मैत्रीत मतभेद होतील. खाण्याची काळजी घ्या. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक कार्यात जुना वाद पुन्हा निर्माण होईल. प्रति÷ा सांभाळा. धोका होईल.

धनु

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. धंद्यातील कामे रेंगाळत ठेवू नका. जुने येणे वसूल करा. नोकरीतील कठीण कामे करून घेता येतील. तुमचा प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. योजना पूर्ण करा. किचकट कामे करून घ्या. संसारातील तणाव मिटवता येईल. स्पर्धा जिंकाल.

मकर

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-चंद्र त्रिकोण योग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी क्षुल्लक तणाव होईल. नम्रपणे समस्या सोडवा. धंद्यात वाद वाढवू नका. नव्या परिचयावर जास्त अवलंबून राहू नका. नोकरीत काम वाढेल. अरेरावीची भाषा राजकीय, सामाजिक कार्यात वापरू नका. तुम्हाला मोठे यश मिळवायचे आहे. स्पर्धेत जिद्द ठेवा. संसारात खर्च वाढेल. पोटाची काळजी घ्या.

कुंभ

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, सूर्य-हर्षल युती होत आहे. धंद्यात वाढ होईल. सप्ताहाच्या सुरुवातीला कायदा मोडू नका. वाद करू नका. नोकरीत वरि÷ तुमच्या कामावर खूष होतील. प्रगतीची संधी मिळेल. नोकरी नसलेल्यांनी प्रयत्न करावेत. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. प्रगतीचा मार्ग मिळेल. कायद्यासंबंधी समस्या मिटवून  टाका.

मीन

या सप्ताहात वृषभेत बुधप्रवेश, बुध-शुक्र युती होत आहे. बुद्धिचातुर्याने कामे करा. वाद न वाढवता धंदा करा. फायदा होईल. योग्य प्रकारे पैसे गुंतवा. नोकरीत काम वाढले तरी तुमचे महत्त्व राहील. अनुभवी व्यक्तींना मानाने वागवा. राजकीय, सामाजिक कार्यात तत्परता ठेवा. समस्या येतील. नम्रपणे कामे करा. जवळच्या व्यक्ती मदत करतील. मैत्री वाढेल.

Related Stories

प्रवाशांच्या संख्येत किंचित वाढ…परिवहनच्या चाकांना गती

Patil_p

रत्नागिरी : २४ तासात तब्बल ६९ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकार गोवंश हत्या आणि लव्ह जिहादवर बंदी घालण्यासाठी विधेयक सादर करणार

Abhijeet Shinde

राज्यभरात 2021 चे जल्लोषी स्वागत

Patil_p

मुश्रीफ, यड्रावकर, कोरे, नरकेंनी केले आमदार जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

Sumit Tambekar

दुर्बल घटकांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध

Omkar B
error: Content is protected !!