तरुण भारत

सचिनची कोरोनावर मात

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरला काही दिवसापूर्वी कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार चालू होते. या व्याधीतून सचिन आता पूर्णपणे बरा झाला आहे. शनिवारी सचिनचा 48 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. या वाढदिवशीच सचिनने कोरोनावर मात केली असून त्याने गरजू रूग्णासाठी प्लाझमा देण्याची घोषणा केली आहे.

Advertisements

27 मार्च रोजी सचिनला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले होते. त्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून तो काही दिवस रूग्णालयात वैद्यकीय इलाजासाठी दाखल झाला होता. गेल्यावर्षी सचिनला काही डॉक्टरांनी प्लाझमा देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला अनुसरून सचिनने प्लाझमा देण्याचा संदेश आपल्या ट्विटरवरून दिला. आहे. 8 एप्रिल रोजी सचिनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यात आले होते. त्यानंतर तो आपल्याच निवासस्थानी आयसोलेशनमध्ये होता. कोरोना व्याधीतून मुक्त झालेल्या व्यक्तींना सचिनने गरजूंसाठी प्लाझमा देण्याचे आवाहन केले आहे. प्लाझमा देण्यापूर्वी सदर व्यक्तीने आपल्या डॉक्टराशी चर्चा करूनच त्यांच्या परवानगीने रक्तदान करावे, असेही सचिनने म्हटले आहे. सचिनने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह झाल्यानंतर सचिनला 21 दिवसांच्या कालावधीकरिता आयसोलेशनमध्ये राहावे लागले होते. सचिनने आपल्यासाठी प्रार्थना करणाऱया असंख्य हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

Related Stories

शेवटच्या प्रयत्नातही मो फराहला अपयश

Amit Kulkarni

NzvsIND : भारताची विजयी सलामी

Abhijeet Shinde

इंग्लंडची सावध सुरुवात

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का; अक्षर पटेलला कोरोनाची बाधा

Rohan_P

केएसए लीगवर प्रॅक्टीस (अ) चा सलग दुसऱयांदा कब्जा 

Abhijeet Shinde

स्पेनला नमवित भारताचा दुसरा विजय

Patil_p
error: Content is protected !!