तरुण भारत

आरसीबी-चेन्नई सुपरकिंग्स ‘हाय व्होल्टेज’ लढत आज

आयपीएल साखळी सामना- सलग पाचव्या विजयासाठी आरसीबी प्रयत्नशील,

मुंबई / वृत्तसंस्था

Advertisements

विराट कोहली व महेंद्रसिंग धोनीचे संघ आज (रविवार दि. 25) आयपीएल साखळी फेरीतील लढतीत आमनेसामने भिडतील, त्यावेळी ती खऱया अर्थाने या मोसमातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असेल. आरसीबीने यंदा आतापर्यंत खेळलेले चारही सामने जिंकले असून आज पाचवा विजय संपादन करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, चेन्नईचा संघही मागील सलग 3 विजयांमुळे निर्धाराने मैदानात उतरण्याची अपेक्षा आहे. ही लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.

चेन्नई सुपरकिंग्सला या हंगामातील पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. पण, त्यानंतरचे सलग तीन सामने त्यांनी ओळीने जिंकले. तीच विजयी घोडदौड येथेही कायम राखण्याचे त्यांचे प्रयत्न असणार आहेत. आरसीबीने यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा 10 गडी राखून अक्षरशः धुव्वा उडवला. पण, आता चेन्नईसारखा अव्वल संघ समोर उभा असल्याने आरसीबीला आणखी ताकदीने मुकाबला करावा लागेल, हे स्पष्ट आहे.

विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीचा अक्षरशः धुव्वा उडवला होता. आज चेन्नईच्या गोलंदाजीविरुद्ध त्यांची जुगलबंदी रंजक ठरु शकते. आरसीबीची फलंदाजी प्रामुख्याने विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स व ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर अवलंबून रहात आली असून पडिक्कलच्या फॉर्ममुळे ती आणखी मजबूत झाली आहे.

आरसीबीची परीक्षा होणार का?

डावाच्या प्रारंभी एखाद-दुसरा धक्का लवकर बसला तर त्यातून सावरण्याची धमक आरसीबी दाखवणार का, हे आतापर्यंत दिसून आलेले नाही. त्यामुळे, चहरने प्रारंभी काही झटके दिले तर आरसीबीच्या फलंदाजी लाईनअपची खऱया अर्थाने ती कठोर परीक्षा असेल. आरसीबीची गोलंदाजी मोहम्मद सिराजमुळे मजबूत आहे. दुसरीकडे, चेन्नईची फलंदाजी देखील भक्कम असल्याने चुरस रंगणे अर्थातच अपेक्षित आहे.

तीन अपयशी डावानंतर ऋतुराजने केकेआरविरुद्ध उत्तम फॉर्मची प्रचिती दिली आणि फॅफ डय़ू प्लेसिससह त्याचे उत्तम को-ऑर्डिनेशन आहे. साहजिकच, या उभयतांनी उत्तम सलामी दिली, तिसऱया स्थानी मोईन अली क्लिक झाला आणि त्यानंतर रैनाने फटकेबाजी केली तर आरसीबीसाठी आव्हानांचा डोंगर उभा राहण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, आर. साई किशोर, मोईन अली, के. गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी. हरी निशांत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः विराट कोहली (कर्णधार), एबी डीव्हिलियर्स (यष्टीरक्षक), ऍडम झाम्पा, देवदत्त पडिक्कल, केन रिचर्डसन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, एमएस वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, डॅनिएल सॅम्स, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमिसन, डॅन ख्रिस्तियन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, फिन ऍलन.

सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 पासून.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अद्यापही फॉर्मच्या प्रतीक्षेत

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा स्टार कर्णधार-यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी या मोसमात अद्याप पूर्ण बहरात येणे बाकी आहे. मागील लढतीत धोनीने आश्वासक सुरुवात जरुर केली. पण, दशकभरापूर्वी त्याच्या खेळीत जी ठासून भरलेली आक्रमकता दिसून यायची, त्याची पुनरावृत्ती अद्याप झालेली नाही. ती कसर आज भरुन निघेल, अशी चेन्नईच्या व धोनीच्या चाहत्यांना अपेक्षा असेल. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 3 विजय व 1 पराभव अशी कामगिरी नोंदवली आहे.

Related Stories

कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार; महिला अटकेत

datta jadhav

कोल्हापूर : कबनुरातील नामवंत डॉक्टर पॉझिटिव्ह ; २५० जण संपर्कात

Abhijeet Shinde

भारतीय महिला क्रिकेट संघासमोर मोठे आव्हान

Amit Kulkarni

ऑस्ट्रेलियन महिलांचे पाचवे जेतेपद

tarunbharat

अष्टपैलू कसोटीवीरांच्या यादीत अश्विन पाचवा

Patil_p

लस खरेदीवर जागतिक पातळीवर पडताळणी करा – आदित्य ठाकरे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!