तरुण भारत

गौतमी आली धावून

प्रवासात कुणाला काय अनुभव येईल हे काही सांगता येत नाही. तुमच्या आमच्याच नव्हे तर सेलिब्रिटी कलाकारांच्या गाठीशीही असे अनेक अनुभव असतात आणि ते त्यांच्या सोशलमीडियावर शेअर करत असतात. अनेक कलाकार हे पुण्यात राहतात आणि मुंबईत शूटिंगसाठी  त्यांना हायवेवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे कधी काय वेळ येईल हेही सांगणे कठीण. असाच अनुभव अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला आला. घाटात गौतमीची गाडी स्लीप झाली पण तिने गाडीवर नियंत्रण मिळवलच पण स्लीप होण्याचं कारण शोधून हायवे पोलिसांनाही कळवलं. पोलिसयंत्रणेने तत्काळ अपघाताचं कारण शोधून उपाय केला ज्यामुळे पाठीमागून येणाऱया कित्येक वाहनचालकांचा जीव वाचण्यास मदत झाली. गौतमीने शेअर केलेल्या या अनुभवासाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माझा होशील ना या मालिकेतून सई या भूमिकेने घराघरात पोहोचलेली गौतमी देशपांडे हिच्या आयुष्यात दोन दिवसांपूर्वीच ही घटना घडली.  गौतमी सांगते, त्या दिवशी मुंबईला जाण्यासाठी मी गाडी चालवत निघाले. हायवेला घाटात आल्यानंतर एका वळणावर माझी गाडी स्लीम झाली. मला क्षणभर काहीच कळेना. माझा स्टेअरिंगवरचा ताबा सुटला. कशीबशी मी गाडी कंट्रोल केली आणि पुढे जाऊन एका लेनवर थांबले. त्याचवेळी माझ्या मागून येणारी एक गाडीही त्याच ठिकाणी स्लीप झाली. ती स्लीप झाल्यानंतर गोल फिरली आणि थांबली. सुदैवाने त्या गाडीतील लोकांना काही इजा झाली नाही. पण ती घटना पाहून मला जरा त्या जागेबाबत संशय आला.  त्मी हायवे पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नेमका स्पॉट सांगितला आणि पोलिस येईपर्यंत थांबले.  पोलिस काही वेळात आले आणि त्यांनी त्या जागेची पाहणी केली असता, त्याठिकाणी डिझेल सांडल्याने गाडय़ा स्लीप होत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यावर माती टाकून ती जागा स्वच्छ केली. ज्यामुळे पुढचे अनर्थ टळले. एक नागरीक म्हणून मला मी केलेल्या या कामाचे खूप समाधान वाटले. पोलिसांनीही माझे आभार मानले.

Advertisements

गौतमीने हा किस्सा शेअर करताना असेही तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की प्रवास करत असताना आपण सजग नागरीक असले पाहिजे. कधी कोणतीही वेळ आपल्यावर येऊ शकते यासाठी हायवे पोलिसांचे संपर्क क्रमांक नोंद करून ठेवावेत. खरंतर गौतमी या अपघातातून बचावली आणि तिने प्रसंगावधान राखून अनेक प्रवाशांचे जीवही वाचवले आहेत. सुरूवातीला गौतमी अपघातातून बचावली असे मेसेज व्हायरल झाले पण त्यानंतर गौतमीचे हा किस्सा शेअर करताच तिच्या कामाचे कौतुक झाले आणि तिला शुभेच्छाही मिळाल्या.

Related Stories

‘गणपत’मध्ये एली अवरामची एंट्री

Amit Kulkarni

रोमान्स’ नव्हे मर्डर मिस्ट्रीचा महिना

Amit Kulkarni

अभिनेत्रींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय

Patil_p

बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौली यांना कोरोना; कुटुंबालाही लागण

Rohan_P

देशासाठी गायक सुखविंदर सिंग यांची साद

Patil_p

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मेरे देश की धरती सज्ज

Patil_p
error: Content is protected !!