तरुण भारत

सौदीकडून 80 टन ऑक्सिजन येणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतातील ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन सौदी अरेबियाकडून 80 टन द्रवरूप ऑक्सिजन भारत विकत घेणार आहे. हा वायू भारताला पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. अदानी उद्योगसमूहाच्या सहकार्याने तो पाठविण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली. एका आठवडय़ात तो भारतात पोहचेल.

Advertisements

सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथील भारतीय दूतावासाने यासाठी सौदी अरेबियाच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली होती. त्यानुसार या विभागाने द्रवरून ऑक्सिजन पुरविण्यास अनुमती दिली. हा वायू सौदी अरेबियातील दमाम येथून मुंद्रा येथील बंदरात लवकरच येईल. 4 आयएसओ क्रायोजेनिक टँकर्समधून हा वायू भारतात आणण्यात येईल. सौदी अरेबियाप्रमाणेच भारताने इतर काही देशांकडूनही ऑक्सिजन विकत घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

सिंगापूरहून भारताने चार क्रायोजेनिक टँक्स विकत घेतले आहेत. त्यांचा उपयोग वायूचे वितरण करण्यासाठी होत आहे. यासाठी भारतीय वायुदलाची विमाने उपयोगात आणण्यात आली. या कठीण प्रसंगी भारताला सर्वतोपरी साहाय्य करण्याची तयारी युरोपियन महासंघाने दाखविली आहे. 8 मे ला महासंघ आणि भारताच्या अधिकाऱयांची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र           मोदीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यावेळी भारताला कशा प्रकारे साहाय्य करायचे यावर विचार केला जाईल. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही भारताला शक्य तितके साहाय्य करण्याचे आश्वासन ट्विटर संदेशातून दिले आहे.

Related Stories

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना 50 लाख, वारसाला सरकारी नोकरी

prashant_c

एक गाव… एक वाचनालय

Patil_p

ऑक्सिजन मृत्यूंसंबंधी केंदाकडून दिशाभूल

Amit Kulkarni

चिपयुक्त ई-पासपोर्ट लवकरच मिळणार

Patil_p

मिरजेत घरफोडी करणारी टोळी जेरबंद; तीन घरफोड्या उघडकीस

Sumit Tambekar

अंतरराष्ट्रीय उड्डाणांचीही केली जात आहे तयारी!

Omkar B
error: Content is protected !!