तरुण भारत

‘खोला मिरचीचा’ दर यंदा भरमसाठ वाढला

प्रतिनिधी / सांगे

चवीला रुचकर, उत्तम रंग आणि तिखटणा यामुळे प्रसिद्ध असलेल्या ’खोला मिरचीचा’ दर यंदा भरमसाठ वाढलेला आहे. याचे कारण म्हणजे उत्पादनात आलेली घट हे एक मुख्य कारण आहे. मुळात यंदा जास्त पाऊस झाल्याने खरीप हंगामात सुमारे चाळीस टक्के पीक खराब झाले. तर गेल्यावषी पीक बंपर आले  होते. पण कॉरोना लॉकडाउनमुळे लोकांना मिरचीची विक्री करता आली नाही. त्यातच बऱयाच लोकांनी गावातच जाहून मिरची खरेदी केली. मुळात काणकोण, केपे तालुक्मयात ’खोला ’ मिरचीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

Advertisements

   खोला मिर्चीला (जि. आय.) उादुज्प्ग्म् इंडिकेशन मान्यता देण्यात आली आहे. या मिरचीला मागणीही जास्त आहे. मुळात यंदा 40 टक्के उत्पादन घटल्याचे शेतकऱऱयांचे म्हणणे आहे. यंदा खोला मिर्चीचा दर प्रति किलो हजार ते बाराशे रुपये पर्यंत गेला आहे. पूर्वी 600 ते 700 पर्यंत प्रति किलो  दराने मिरची मिळत असे. गेल्यावषी कॉरोना लॉक डाउन असल्याने दारात येऊन ग्राहक मिरची खरेदी करू लागल्याने दर वाढला होता. त्यात आत्ता आणखीन भर पडली आहे.

रब्बी हंगामात लावलेल्या मिरचीचे उत्पादन देखील घटल्याची माहिती मिळाली. याचे कारण म्हणजे दोन तीनवेळा अवेळी पडलेला पाऊस हे कारण आहे. याशिवाय केपे व सांगे तालुल्यात पारंपरिक मिरचीचे पीक घेतले जाते. मुख्यता पावसाळय़ात हे पीक घेण्यात येते. तसेच रब्बी हंगामात घेण्यात येते. मात्र खोला मिरचीच्या प्रमाणात ही मात्रा कमी आहे. खोला मिरची पाठोपाठ पोरसाची मिरची म्हणून संबोदल्या जाणाऱया या मिरचीचा दर प्रतिकिलो आठशे ते हजार इतका आहे.

केपे, काणकोण, सांगे तालुक्मयातील डोंगराळ भागात जास्त करून अनुसूचित जातीच्या लोकांकडून लाल सुक्मया मिरचीचे उत्पादन घेतले जाते.

ग्रीन मिरचीचे उत्पादनही घटले!

सुक्मया मिरची बरोबर ग्रीन मिरचीचे उत्पादन घटले आहे. याचे कारण म्हणजे पीक तयार होण्याच्या वेळी पडलेला पाऊस. त्यामुळे पीक खराब झाले. ग्रीन मिरचीची शेतकरी फालोधान महामंडळाला विक्री करतात. विशेषता लाल सुकी मिरची हेक्टरी 350 किलो ज्arब्aहू??येते तर ग्रीन (ओली ) मिरचीचे दहा ते बारा टन पर्यन्त उत्पन्न येत असल्याची माहिती शेतकऱयाने दिली. सध्या गोवा फालोधान महामंडळ रू. 27 प्रति किलो दर देत आहे.

 गेल्या वषी मिरचीचे बंपर पीक आले. तसेच लॉक डाउन असल्याने गोव्याबाहेर मिरची गेली नाही. त्यामुळे यंदा सांगे विभागातील शेतकऱयाने मोठय़ा प्रमाणात ग्रीन मिर्चीची लागवड केली नाही. तसेच दुसऱया वषी त्याच जमिनीत ग्रीन मिर्चीची लागवड केली तर रोग व किडीचा जास्ती प्रादुर्भाव लागतो अशी माहिती सांगेच्या विभागीय कृषी अधिकारी गौरी प्रभुदेसाई यांनी दिली. सांगे तालुक्मयात पारंपरिक लाल मिरचीचे पीक घेण्याकडे लोकांचा कल कमी आहे. जास्ती पाऊस पडल्याने तसेच अवेळी पडलेला पाऊस यामुळे उत्पादनात घट आल्याचे केपेचे विभागीय शेती अधिकारी संदेश राऊत देसाई यांनी सांगितले.

केपे तालुक्मयातील सुमारे तीस हेक्टर जमिनीत पावसाळी लाल सुकवीलेली  मिरचीचे पीक घेण्यात येते. सध्या बाजारात ग्रीन मिरची रुपये दराने विकली जात आहे.

Related Stories

पणजीसाठी भाजपमध्ये तिरंगी धुसफूस

Amit Kulkarni

फोंडा तालुक्यात जोरदार पाऊस

Amit Kulkarni

गोव्यातील खाणींचे खरे मालक कोण?

Patil_p

गोवा ’टीएमसी’ म्हापसामध्ये मजबूत होत आहे वकील तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी म्हापसा गटाध्यक्ष गौतम पेडणेकर पक्षात सामील

Amit Kulkarni

सरकार मुख्यमंत्री नव्हे, मोन्सेरात चालवतात !

Amit Kulkarni

स्थानिकांना रेती व्यवसाय करू द्यावा : कांदोळकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!