तरुण भारत

जोतिबाचा चैत्र उत्सव यंदाही साधेपणाने

दवणानिमित्त जोतिबाची पालखी : नार्वेकर गल्लीतील देवस्थानात शास्त्रपूजेसह अभिषेक

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लाखो भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या जोतिबाचा चैत्र उत्सव यंदाही कोरोनाच्या छायेखाली साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला. त्यामुळे येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानात जोतिबाच्या नावानं चांगभलं, केदारनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात जोतिबाची रविवारी रात्री 12 वाजता शास्त्रपूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे 3 वाजता दवणा अर्पण करण्यात आला. यावेळी कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे, अशी प्रार्थना करून पुढच्या वषी तरी देवाची पायीवारी घडू दे, अशी मागणी करण्यात आली.

 जोतिबाच्या चैत्र उत्सवाला प्रारंभ झाला असून शनिवारी कामदा एकादशीदिवशी देवाला खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर रविवारी द्वादशी दिवशी पहाटे 6 वाजता देवाला लघुरुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी रविवारी सकाळी 8 वा. आरती करण्यात आली. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मंदिरातील सेवेकरांना मानाचे विडे देण्यात आले.

यावेळी सायंकाळी 7 वा. जोतिबा देवाला पालखीत बसवून ढोल ताशांच्या गजरात देवावर गुलाल, खोबऱयाची उधळण करण्यात आली आणि देवाला खेळविण्यात आले. रात्री 12 वाजता शास्त्रपूजा, अभिषेक करून पहाटे 3 वा. जोतिबा देवाला तयार करण्यात आलेला दवणाचा तुरा अर्पण केला. यावेळी सामाजिक अंतर पाळून सर्व धार्मिक विधी मंदिरापुरते मर्यादित करण्यात आले.

Related Stories

श्री सिद्धेश्वर गो-शाळेचा शुभारंभ

Omkar B

एस. पी. घाळी ज्युनियर लीग क्रिकेट स्पर्धा : ग्लॅडिएटर्स, रायकर वॉरियर्स संघ विजयी

Amit Kulkarni

भक्त प्रल्हाद केंद्राच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Omkar B

पाणीपुरवठा कामगारांचे आंदोलन : पाणीपुरवठा ठप्प

Amit Kulkarni

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर

Patil_p

हिंडलगा-विजयनगर-लक्ष्मीनगर भागातील गटारी कामांना प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!