तरुण भारत

मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज जोतिबाची चैत्र यात्रा

विनोद चिखलकर / जोतिबा डोंगर

दख्खनचा राजा जोतिबा देवाची सोमवार 26 एप्रिलला होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे. परंपरेनुसार चैत्र यात्रेचा धार्मिक विधी काही मोजक्याच पुजारी व देवसेवकांच्या उपस्थित होणार असून मोठा धार्मिक सोहळा, सासन काठी सोहळा होणार नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Advertisements

 यात्रेच्या मुख्य दिवसानिमित्त सोमवारी पहाटे तीन वाजता मंदिरात घंटनाद होऊन श्रीं च्या मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. यानंतर पहाटे चार ते पाच यावेळी `श्रीं’ ची पाद्यपूजा, काकडआरती व मुखमार्जन तर पहाटे सहा वाजता पन्हाळÎाचे तहसिलदार रमेश शेडगे यांच्या हस्ते शासकीय महाभिषेक होईल. यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता तोफेची सलामी देऊन पालखी मिरवणूक सोहळÎामध्ये 21 मानकरी पुजारी, देवस्थान समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत यमाई मंदिराकडे जाईल. यानंतर रात्री आठ वाजता यमाई मंदिरात धार्मिक विधी आटोपल्यानंतर पालखी सोहळा जोतिबा मंदिराकडे येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द केली असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शनिवारी रात्रीपासून ते सोमवार रात्रीपर्यत हा पोलीस बंदोबस्त असणार आहे. या कालावधीत बाहेर गावच्या कोणत्याही व्यक्तीला जोतिबा डोंगरावर प्रवेश दिला जाणार नाही. यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

पाच पुजारी पॉझिटिव्ह

श्री जोतिबाची सोमवार 26 रोजी होणाऱ्या चैत्र यात्रा धार्मिक विधी, पालखी सोहळ्यासाठी २५ मानकरी, पुजाऱ्यांना हा विधी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यातून २१ जणांची निवड करण्यात येणार होती. या सर्वांची कोविड टेस्ट केली असता यामध्ये पाच पुजारी पॉझिटिव्ह आढळले.

Related Stories

”रेमडेसीवीर खरेदी प्रकरणी फडणवीसांची चौकशी झाली पाहिजे”

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कळंब्यातील जुगार अड्यावर छापा ; शस्त्रासह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

संविधान, कायदा, धर्मनिरपेक्षतेबाबत गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

Abhijeet Shinde

लग्न खर्चाला फाटा देऊन अनाथ मुलींना केली मदत

Abhijeet Shinde

ठाणे, कल्याण डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत पुन्हा लॉक डाऊन

Rohan_P

शहीद 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटींची भरपाई द्या – वरुण गांधी

Sumit Tambekar
error: Content is protected !!