तरुण भारत

आयटी कंपन्यांकडून 1 लाख जणांची होणार भरती

टीसीएस आघाडीवर – वेतनवाढ, बोनसही मिळणार

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisements

येणाऱया काळात देशातील मोठय़ा आयटी कंपन्या नोकर भरतीवर भर देणार असून 1 लाख जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे समजते. यामध्ये टीसीएस आणि विप्रो या नामवंत कंपन्यांचाही समावेश असणार आहे.

देशातील युवा उमेदवारांसाठी आयटी कंपन्यांनी आगामी काळात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. 2020-21 वर्षामध्ये 1 लाखपेक्षा अधिक नव्या उमेदवारांना भरती करून घेतले जाणार आहे. भरतीचे हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 45 टक्के अधिक आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो यांनी आपल्या कंपनीमध्ये नव्या उमेदवारांना संधी प्राप्त करून दिली आहे. कोरोनाच्या या काळामध्ये वर्क फ्रॉमची संस्कृती अवलंबली जात असून याचा फायदा आयटी क्षेत्रातील कंपन्यांनीही उठवला आहे. जानेवारी ते मार्चच्या दरम्यान या क्षेत्रातील कंपन्यांना वर्षाच्या तुलनेत पाहता जास्त नफा झाला आहे.

देशातील मोठी आयटी कंपनी टीसीएसने एप्रिल 2020 ते मार्च 2021 च्या दरम्यान 40 हजार प्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या भरतीनंतर कंपनीतील एकूण कर्मचाऱयांची संख्या 5 लाखावर पोहचणार आहे. याचप्रमाणे एचसीएल टेक 12000, इन्फोसिस 26000 आणि विप्रो 9000 प्रेशर्सना नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. याचबरोबर कंपन्या वेतन वाढीसह बोनसही देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भरतीत वाढ का ?

कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे अनेकांना आपल्या ऑफिसचे काम घरातूनच करावे लागते आहे. ऑफिसचे काम करण्यासाठी इंटरनेटची गरज लागते. तेव्हा इंटरनेटवर आधारीत सॉफ्टवेअरची मागणी या काळात वाढली आहे. यामध्ये भारतीय कंपन्यांना इतरांच्या तुलनेत जास्तीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. म्हणूनच आयटी कंपन्यांनी भरतीत वाढ करण्याचे नियोजन केले आहे.

महामारीच्या काळामध्ये देशातील आघाडीवरच्या तीन आयटी कंपन्यांनी भरतीत चांगली कामगिरी पार पाडली आहे. मार्च 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान 72,079 प्रेशर्सना भरती करून घेण्यात आले आहे. यामध्ये टीसीएस 40000 जणांना नोकरी देत आघाडीवर राहिली आहे. या आधीच्या 2019-20 या आर्थिक वर्षात 49,887 जणांची भरती करण्यात आली आहे.

फेब्रुवारीत 11 लाख जणांना मिळाली नोकरी

 मुंबई ः कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) च्या माहितीनुसार या वर्षी फेब्रुवारीमध्ये 11.58 लाख जण नवे सदस्य जोडले गेले आहेत. याचाच अर्थ वरील जणांना नोकरीची संधी सदरच्या महिन्यामध्ये उपलब्ध झाली आहे. ईएसआयसीने या संदर्भातील माहिती नुकतीच जाहीर केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याशी संबंधित माहितीच्या आधारे वरील आकडेवारी ईएसआयसीने प्रसिद्ध केली आहे. ईएसआयसी योजनेनुसार जून 2020 मध्ये 8.87 लाख, मे मध्ये 4.89 लाख आणि एप्रिलमध्ये 2.63 लाख नवे सदस्य जोडले गेले आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलत दिली गेल्यानंतर नोकर भरतीमध्ये वाढ दिसून आली आहे. यापैकी अनेकांना नियमीत स्वरुपाची योग्य वेतनाची नोकरी प्राप्त झाली आहे.

Related Stories

टाटा स्टील भक्कम नफ्यात

Patil_p

संचारबंदीच्या कालावधीत वीज मागणी 26 टक्क्मयांनी घटली

tarunbharat

लॉकडाऊननंतर चीनची अर्थव्यवस्था 3.2 टक्क्मयांनी वधारली

Patil_p

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स कोसळला

Patil_p

पार्ले ऍग्रोकडून 10 हजार कोटीच्या उलाढालीचे ध्येय

Omkar B

चहा उद्योगातील कर्मचाऱयांसाठी लवकरच कल्याणकारी योजना?

Amit Kulkarni
error: Content is protected !!