तरुण भारत

पंतप्रधान मोदींकडून सेनेच्या सज्जतेची चाचपणी

संरक्षण दल प्रमुख रावत यांची घेतली भेट, कोरोनाविरूद्धच्या संघर्षात प्रमुख भूमिका

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण दल प्रमख जनरल बिपीन रावत यांची भेट घेऊन कोरोना विरुद्धच्या संघर्षात सेना दलांच्या सज्जतेसंबंधी चर्चा केली आहे. तसेच सेनादलांनी चालविलेले उपक्रम आणि प्रकल्प यांचीही माहिती घेतली. सेना दले कोरोना संकट दूर करण्यासाठी संपूर्ण सज्ज असून देशवासियांना शक्य तितके सर्व साहाय्य करतील, असे वचन जनरल रावत यांनी त्यांना दिले.

भारतीय भूदलाने गेल्या दोन वर्षांमध्ये निवृत्त झालेल्या किंवा स्वयंनिवृत्ती घेतलेल्या आपल्या सर्व डॉक्टर्सशी संपर्क केला असून त्यांना सेवेसाठी बोलावून घेतले आहे. सैन्यातून निवृत्त झालेल्या इतर वैद्यकीय अधिकाऱयांनाही बोलाविण्यात आले असून त्यांना त्यांच्या निवासस्थानांजवळच्या कोरोना उपचार केंद्रांमध्ये त्यांची सेवा देण्यास सांगण्यात आले आहे. तातडीच्या हेल्प लाईन्सच्या माध्यमातून आवश्यक असेल तेथे सेवा देण्यास हे अधिकारी सज्ज आहेत.

त्याचप्रमाणे सध्या सेवेत असणारे सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकारी यांना भूदलाचे मुख्यालय, विभागीय मुख्यालये, वायुदलाचे मुख्यालय आणि इतर विभागीय मुख्यालये आणि नौदलाचे मुख्यालय आणि विभागीय मुख्यालये यांच्या कार्यकक्षेत येणाऱया रूग्णालयांमध्ये सेवा देण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती जनरल रावत यांनी पंतप्रधान मोदींना दिल्याचे नंतर स्पष्ट करण्यात आले.

परिचारिकांचीही सेवा

सेनादलांमध्ये काम करणारे परिचारक व परिचारिका (नर्सिंग कर्मचारी) यांना मोठय़ा संख्येने डॉक्टर्सना साहाय्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कर्मचाऱयांनी त्यांचे काम सुरू केले असून कोरोनाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आणखी अनेक योजना सेनादलांकडून हाती घेतल्या जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी यासंबंधी समाधान व्यक्त केले.

प्राणवायूही पुरविणार

सेनादलांकडे जो प्राणवायूचा साठा आणि सिलिंडर्स आहेत, ते कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करण्याचा आदेश देण्यात आला आहे. सेनादलांच्या अनेक आस्थापनांमध्ये असलेला द्रवरूप प्राणवायूचा साठा आणि इतर सामग्रीही या संकटकाळात नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जनरल रावत यांनी स्पष्ट केले.

Related Stories

टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ईडीकडून समन्स जारी

Rohan_P

वाढत्या प्रकोपापासून सावध व्हा!

Patil_p

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल शपथबद्ध

Patil_p

अभिनेत्री खुशबू यांचा भाजपमध्ये प्रवेश

Omkar B

कोरोनाच्या जाळय़ात सापडले ‘देवदूत’

Patil_p

आणखी एका शेतकऱयाची गाझीपूर सीमेवर आत्महत्या

Patil_p
error: Content is protected !!