तरुण भारत

सिव्हीलमध्ये लसीकरणासाठी तुडवातुडवी

स्वतःच्या जीवासाठी केली जातेय गर्दी

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

सातारा शहरातील प्रत्येक नागरिकांना आता कोरोनावरील लस घ्यायची आहे. लसीचे महत्व पटू लागले आहे. त्याकरता लसीकरण केंद्राबाहेर सकाळीच नंबर लावण्यासाठी नागरिक जात आहेत. सोमवारी सकाळी तर लसीसाठी आलेल्यांच्यामुळे नंबरवरुन तुडवातुडवी झाली. झालेला योट काही केल्या वॉचमनलाही आवरला नाही. सरळ नागरिकांची गर्दी लसीकरणाच्या टेबलपर्यंत पोहचली. गर्दीच्या भितीने लस देणाऱया कर्मचाऱयांनीच आपला गाशा गुंडाळला. ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना समजली. त्यांनीही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना फोन करुन माहिती दिली. दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाबाहेर लसीसाठी तुडवातुडवी झाली. पण एक तारखेपासून ही गर्दी कशापद्धतीने आटोक्यात आणणार असा यक्ष प्रश्न उभा आहे.

सातारा शहरात तब्बल 1 लाख 50 हजार लोकसंख्या असून दररोज बाधित होण्याचे प्रमाण मोठे असल्याने आणि दररोज अनेकांचे जीव जात असल्याच्या बातम्या पाहून अनेकांना आपला जीव वाचवण्यासाठी लस घेतली पाहिजे याचे महत्व पटू लागले अन् त्याकरता जो तो लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जावू लागला. सातारा शहरातील प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयातल्या लसीकरण केंद्रावर पहाटे पाच वाजल्यापासूनच नंबर लावण्यासाठी नागरिक जमतात. ही रांग सात वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या गेटपर्यंत पोहचलेली असते. पाठीमागून नंबर जवळ आल्यावर इतर कुटुंबियांना बोलवले जाते. अन् गर्दी आणखी वाढते. त्या गर्दीतच कोरोनाची भिती प्रत्येकाला लागलेली आहे. सोमवारी सकाळी नंबर लावण्यावरुन अनेकांची वादावादी सुरु झाली. केंद्रावर लस आली ती दहा वाजता. दहा वाजता लस येण्यापूर्वीच तब्बल तीन तास रांगेत थांबलेल्यांचा रागाचा पारा चढला अन् मग घुसाघुसी सुरु झाली. काही ज्येष्ठ नागरिक थेट आतमध्येच घुसले अन् केंद्रातील लस देण्याच्या टेबलपर्यंत पोहचले. अचानक झालेल्या गोंधळामुळे तेथील कर्मचाऱयांना सुरुवातीला काही सुधारेना अशी परिस्थिती झाली. त्यांनी लगेच सगळे पॅकऍप केले अन् दोन्ही दारे बंद केली. पाठीमागच्या दाराने दुसऱया डोसवाल्याना घेतले जात होते तर पहिल्या डोसवाल्यांना पुढच्या दाराने घेतले जात होते. दोन्ही दारांमध्ये तोबा गर्दी पाहून वॉचमनही गोंधळला अन् त्याने दार लावताच संतप्त झालेल्या नागरिकांनी लाथाबुक्या गेटवर मारुन राग व्यक्त केला. तब्बल दोन ते अडीच हजार जणांहून अधिक जण लस घेण्यासाठी जमले होते. ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना समजताच त्यांनी फोनवरुन लगेच याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिली. केवळ पाच पोलीस आले तरी पाचही पोलिसांना गर्दी आटोक्यात आली नाही. तुडवातुडवी, वादावादीचे प्रकार सुरुच होते. जेव्हा गेट बंद केल्यानंतर काही वेळानंतर बंद झालेल्या लसीकरणाला प्रारंभ झाल्याने वातावरण निवळले.

अर्धा तास वेटींग रुम गायब

लस घेतल्यानंतर लस घेणाऱयास अर्धा तास ऑबझरवेशनखाली ठेवण्यात येते. त्याकरता एक वेटींग रुम लसीकरण केंद्राबाहेर तयार केलेली आहे. लसीकरण केंद्राबाहेर एवढी गर्दी असल्याने ऑबझरवेशन खोलीमध्येही गर्दी झाल्याने नेमके कोणाला ऑबझरवेशन करायचे हेही तेथील कर्मचाऱयांना समजत नव्हते. त्यामुळे ती खोलीच गायब झाल्याचे चित्र दिसत होते.

उद्यापासून टोकन पद्धतीचा अवलंब करणार

एसपींनाही सांगितले. म्हणलं सर हे मॉब कंट्रोल करणे हे आमच्या हाताबाहेर आहे. आम्हाला तीन चार कॉन्स्टेबल द्या.बीजेपीचे व्हॉलिंटीअर आले होते. त्यांनाही म्हटल की तात्काळ मला मदत करा. मला मदतीची गरज आहे. दोन्ही ठिकाणीही. एक लसीकरण केंद्र आणि टेस्टींगच्या ठिकाणी. उद्यापासून टोकन सिस्टीम करु, पाचशे डोस आले तर पाचशे लोकांना टोकन देवूया. गर्दीला आवर घालता येईल. लोकांनाही माहिती होईल. आज लस मिळणार नाही ते. लोक काय करतात. मी सांगतोय. जिल्हा प्रशासन सांगतय. त्याच कोणत्याही प्रकारचे पालन होत नाही. आता सोशल डिस्टन्सींग ठेवण ही प्रक्रिया कितीवेळा सांगायची. लोकांनी लोकांची थोडी काळजी घेतली पाहिजे ना. सुरक्षित अंतर ठेवावे यासाठी जर मला माणस ठेवावे म्हटल तर माझ्याकडे तेवढी माणसं नाहीत. आमचा सुरक्षा रक्षक आहे तो आतमध्ये काम करतो. जिथ नोंदणी केली जाते तेथे तो कार्यरत आहे. त्याला सुचना केल्या आहेत. गर्दीचे नियोजन करणे हे शक्यच नाही. लस येते किती हेही समजत नाही. किती लस येणार हे अगोदर कळली तर त्याचे नियोजन करता येईल. पावणे दहा पर्यंत लस किती मिळणार हे मलाही लसीचे माहिती नव्हते. लोक आल्यानंतर आपण अचानक कसे त्यांना म्हणू शकतो एवढेच देणार तेवढेच देणार. ते पण केले आम्ही. आज दोन हजार लस आली होती त्याचे नियोजन केले होते. सेंट पॉलमध्ये लसीकरण केंद्र करायला सगळय़ा सोयी सुविधा द्यायला हव्यात.

डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा शल्यचिकित्सक

Related Stories

महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला…

datta jadhav

डबल सीटवर सातारा वाहतूक शाखेची कारवाई

Patil_p

हनीट्रपप्रकरणी सातारा जिल्हय़ातील चौघे जेरबंद

Patil_p

शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद – नवाब मलिक

triratna

कोल्हापूर : क्लस्टर पध्दतीच्या परीक्षा गुरूवारपासून घ्या

triratna

कोल्हापुरात आजपासून कोरोना स्वॅब तपासणी, शेंडा पार्कमध्ये लॅब कार्यान्वित

Shankar_P
error: Content is protected !!