तरुण भारत

सत्ता मिळाली, आता रंगणार नगराध्यक्षपदासाठी चढाओढ

गोवा फॉरवर्डतर्फे तीन, तर काँग्रेसतर्फे दोन नगरसेवक दावेदार राहण्याची शक्यता

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

मडगाव पालिकेत अपेक्षेप्रमाणे गोवा फॉरवर्डचे फातोर्डा फॉरवर्ड पॅनल व काँग्रेसचे मॉडेल मडगाव पॅनल यांच्या आघाडीला तब्बल 17 जागा मिळाल्या असून मोठी आघाडी घेऊन पुन्हा एकदा त्यांनी पालिकेवर झेंडा फडकविला आहे. सोमवारच्या ‘तरुण भारत’च्या अंकात या आघाडीला सत्ता मिळण्याची चिन्हे असल्याचे वृत्त देण्यात आले होते. ते खरे ठरले आहे. आता नगराध्यक्षपदासाठी या दोन्ही गटांतील इच्छुक नगरसेवकांमध्ये चढाओढ दिसून येणार असून फातोर्डा फॉरवर्डतर्फे लिंडन पेरेरा, राजू नाईक व माजी नगराध्यक्षा पूजा नाईक, तर काँग्रेस पॅनलमधील माजी नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर व दामोदर शिरोडकर हे मुख्य दावेदार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मावळत्या मंडळातील लिंडन पेरेरा, पूजा नाईक हे दोनच माजी नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत, तर जॉनी क्रास्टो, सदानंद नाईक, बबिता नाईक, घनश्याम शिरोडकर, दामोदर शिरोडकर, राजू नाईक या 6 नगरसेवकांचे पालिकेत पुनरागमन झाले आहे. गेल्या वेळी मडगाव पालिकेवर या आघाडीचे 17 उमेदवार निवडून आले होते. फातोर्डा फॉरवर्डने फातोर्डातील सर्व जागा जिंकून त्यावेळी भाजप पॅनलचा धुव्वा उडविला होता, तर मडगावात काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या. एकूण 17 जागा मिळाल्यानंतर आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. बबिता प्रभुदेसाई यांची बिनविरोध निवड झाली होती.

एकत्र बसून निर्णय घेणार : सरदेसाई

मागील वेळी फातोर्डा फॉरवर्डच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने नगराध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. यंदा गोवा फॉरवर्डला 9 व काँग्रेसला 8 जागा मिळाल्या असून जादा फरक नसल्याने मडगाव मतदारसंघातील नगरसेवक नगराध्यक्ष असायला हवा अशी मागणी पुढे येऊ शकते. यासंदर्भात गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले आमदार विजय सरदेसाई यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात आघाडीचे दोन्ही घटक एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

गोवा फॉरवर्डच्या नगरसेवकांवर नजर टाकल्यास प्रभाग 11 चे नगरसेवक राजू नाईक जास्त अनुभवी असून यंदा ते पुनरागमन करत असले, तरी ते एकंदरित चौथ्यांदा नगरसेवक बनले आहेत. यापूर्वी उपनगराध्यक्ष म्हणून कारभार सांभाळण्याचा अनुभव त्यांना आहे. दुसरीकडे मावळत्या मंडळात नगराध्यक्ष राहिलेल्या युवा पूजा नाईक व दुसऱयांदा निवडून आलेले लिंडन पेरेरा हे अन्य दावेदार ठरू शकतात.

काँग्रेसच्या नगरसेवकांवर नजर टाकल्यास पुनरागमन करणारे घनश्याम शिरोडकर हे अनुभवी असून यापूर्वी दोन वेळा त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुनरागमन करणारे अन्य एक नगरसेवक दामोदर शिरोडकर हेही दुसऱयांदा नगरसेवक बनले असल्याने त्यांचा या पदासाठी दावा असण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. आघाडीतील अन्य बहुतेक नगरसेवक नवीन असल्याने तसेच पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने त्यांच्या गळय़ात नगराध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्मयता कमीच असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

मांद्रेत संगीत रजनीच्या विरोधात निदर्शने ,मांदे सरपंचाच अवमान

Patil_p

आप नेते व्हेन्झी व्हिएगशना उद्योजकांचा वाढता पाठिंबा

Amit Kulkarni

नव्या विधानसभेत ओबीसींचे प्रमाण सर्वाधिक असावे

Amit Kulkarni

‘ओबीसी’च्या आरक्षीत नोकऱया त्वरीत भराव्यात

Amit Kulkarni

मोलेतील तिन्ही प्रकल्प गोव्याच्या हिताचे

Omkar B

चित्रापूर मठाच्या परवान्यावरुन कुंडई ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक

Amit Kulkarni
error: Content is protected !!