तरुण भारत

कोरोना : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविले

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याला दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती तिहार जेलमधील अधिकाऱ्यांनी सोमवारी दिल्लीतील सत्र न्यायालयाला दिली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

Advertisements


छोटा राजनला 2015 मध्ये इंडोनेशियाच्या बाली येथून प्रत्यार्पण करारानुसार ताब्यात घेत दिल्लीतील तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तर मुंबईतही त्याच्या विरोधात अनेक प्रकरणे होती. ती सीबीआयकडे सोपविण्यात आली. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात सुरु आहे.  


दरम्यान, तिहारच्या सहाय्यक तुरुंग अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे छोटा राजनला हजर केले जाऊ शकणार नाही. कारण त्याला कोरोनाची लागण झाली असून त्याला आता दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मागील काही दिवसांपूर्वी लक्षणे दिसल्यानंतर छोटा राजन याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात छोटा राजनला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, येथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना चाचणी करून घेण्यास आणि होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. यापूर्वी बिहारचा बाहुबली आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यालाही करोनाची लागण झाली होती. 

Related Stories

अभिनेता सुशांतसिंह राजपुतची गळफास घेऊन आत्महत्या

datta jadhav

हैदराबाद विमानतळावर 11 प्रवाशांकडून जप्त केले 1.66 कोटींचे सोने

Rohan_P

भयावह रुग्णवाढ : देशात 24 तासात 2.61 लाख बाधित

datta jadhav

नोएडा : ओप्पो कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Rohan_P

रस्त्यांचे खड्डे भरतेय वृद्ध दाम्पत्य

Patil_p

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट

Patil_p
error: Content is protected !!