तरुण भारत

काहेर विद्यापीठातर्फे वेबिनार

बेळगाव : काहेर विद्यापीठाच्या डॉ. प्रभाकर कोरे बेसिक सायन्स रिसर्च सेंटरतर्फे ‘रेग्युलेटरी कंप्लायन्स ऍण्ड लॅबोरेटरी प्रॅक्टिसीस’ या विषयावर वेबिनार घेण्यात आले. या वेबिनारमध्ये प्रयोगशाळेतील कामकाजाची गुणवत्ता, उत्पादन गुणवत्ता, दर्जा सुरक्षितता यावर चर्चा करण्यात आली. डॉ. रमेश परांजपे, डॉ. शामकुमार व डॉ. श्रीनिवास पाटील यांनी या विषयावर माहिती दिली. कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांनी वेबिनारचे उद्घाटन केले. तसेच देशाच्या विकासात संशोधन प्रक्रिया महत्त्वाची आहे, असे सांगितले. कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी सुक्ष्म पातळीवर होणाऱया संशोधनाचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. अनिता देसाई यांनी ऍक्रिडेशन प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सुनील दोडमनी यांनी वेबिनारचा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी डॉ. सत्वीर जगवानी, डॉ. रिथीहा उप्पीन, धनश्री पाटील, डॉ. अभिजित भटकळ, गीतांजली मास्तीहोळीमठ, डॉ. वाणीश्री बुबनाळे आदी उपस्थित होते. कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा येथील 90 हून अधिक प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला. विद्यापीठाच्या संचालिका डॉ. सुनीता पाटील यांच्या उपस्थितीत वेबिनारचा समारोप झाला.

Related Stories

मार्कंडेयमध्ये 27,215 क्विंटल साखर उत्पादन

Patil_p

कॅसलरॉक-दूधसागरदरम्यान घातले काँक्रिट स्लिपर्स

Patil_p

मुख्य डेनेजवाहिनी तुंबल्याने समस्या

Amit Kulkarni

भगवेमय वातावरणात दुर्गामाता दौड

Amit Kulkarni

55 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या

Rohan_P

कॅम्पमधील वाल्मिकी मंदिर हस्तांतर करण्यासाठी नोटीस

Patil_p
error: Content is protected !!