तरुण भारत

वळीव पावसाचा हेस्कॉमला दणका

खांब कोसळून नुकसान : विजेचा लपंडाव सुरूच

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

मागील तीन-चार दिवसांपासून बेळगाव शहर व तालुक्मयात वळिवाने दणका दिला आहे. वारा-पावसामुळे विजेचे खांब कोसळून हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. इन्शुलेटरमध्ये पाणी उतरल्याने शहरातील बऱयाच भागात रविवारी व सोमवारी विजेचा खेळखंडोबा सुरू होता. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता.

शुक्रवारपासून बेळगाव शहर व उपनगरात पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल होऊ लागल्याने वीज खांबांवर झाडे तसेच फांद्या कोसळून नुकसान झाले आहे. शहराच्या उत्तर भागासोबतच दक्षिण भागातही वीजखांब व वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला. रविवारी दुपारपासून विजेचा खेळखंडोबा सुरूच होता. रात्री उशिरा काही भागातील वीजपुरवठा सुरळीत केला गेला.

औद्योगिक कारखान्यांना बसला फटका

रविवारी झालेल्या पावसामुळे मच्छे, वाघवडे, उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतींमधील विद्युत वाहिन्या तसेच खांबांचे नुकसान झाले आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने कारखाने बंद होते. परंतु सोमवारी वीजपुरवठा नसल्याने कामगारांना वीजपुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहावी लागली. सोमवारी दुपारपर्यंत सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत

रविवारच्या पावसामुळे शहरातील काही भागात हेस्कॉमचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा ठप्प झाला होता. टप्प्याटप्प्याने त्या-त्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

-विनोद करूर (साहाय्यक कार्यकारी अभियंते)

Related Stories

नूतन जिल्हाधिकाऱयांनी स्वीकारली सूत्रे

Amit Kulkarni

जिल्हय़ात 22 शिक्षकांना कोरोनाची लागण

Patil_p

विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Amit Kulkarni

ज्ञान प्रबोधन मंदिरमध्ये शिक्षक दिन साजरा

Amit Kulkarni

गुंजी माऊलीदेवी यात्रोत्सवाची सांगता

Amit Kulkarni

भाजप उमेदवाराला अनुकूल वातावरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!