तरुण भारत

आम्हालाही व्यवसाय करण्यास मुभा द्या

कापड, सराफी व्यावसायिकांची जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कोविड-19 मुळे गेल्या वर्षभरापासून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. असे असताना पुन्हा क्लोजडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर परिसरातील कापड दुकाने, सराफी दुकाने आणि इतर काही दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर झाला असून इतर व्यवसायांप्रमाणे आम्हालाही व्यवसाय करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी कापड व सराफ व्यापाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोरोनाचे नियम पाळत आम्ही व्यवसाय करू. मात्र अचानकपणे आमची दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आम्हाला कर्ज भरणे अशक्मय झाले आहे. याचबरोबर कामगारांचा पगार देणेही कठीण झाले आहे. यामुळे सरकारचेही मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रींना जशी परवानगी दिली आहे तशीच आम्हालाही द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. हरिषकुमार यांना निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी व्यावसायिक उपस्थित होते.

Related Stories

फिनाईल विक्रीच्या नावाखाली विजापुरात दरोडा

Patil_p

जिल्हय़ात आणखी 38 कोरोना रुग्णांची भर

Patil_p

कुद्रेमनी येथे बसथांब्याचे उद्घाटन

Patil_p

खतरनाक प्रकाश पाटील आणि… डिसेंबरचा महिना

Patil_p

शारदोत्सव सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘हेरिटेज वॉक’

Amit Kulkarni

काटामारी रोखण्यासाठी वजनकाटे उपलब्ध करावेत

Amit Kulkarni
error: Content is protected !!