तरुण भारत

गुरुवारपेठ टिळकवाडी येथे रस्त्यावर टाकला जातोय कचरा

बेळगाव : गुरुवारपेठ टिळकवाडी येथे कचराकुंडी नसतानाही काही नागरिक रस्त्याशेजारी कचरा आणून टाकत आहेत. टाकण्यात आलेला कचरा जनावरे तसेच इतर प्राणी अस्ताव्यस्त पसरवत असल्याने याचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.  बेळगाव शहरात कचरा गोळा करण्यासाठी वाहन असतानादेखील काही बेजबाबदार नागरिक रस्त्याशेजारी कचरा टाकत आहेत. या कचऱयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा परिसर गलिच्छ दिसत असल्याने कचरा टाकणे बंद करणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

Related Stories

शहराला नवरात्रीचे वेध

Amit Kulkarni

चेंबरवर झाकण नसल्याने वाहनधारकांना धोका

Amit Kulkarni

महामोर्चा-सायकल फेरीसाठी गावोगावी जागृती करणार

Amit Kulkarni

जनावरांचा बाजार बंदमुळे शेतकऱयांना फटका

Patil_p

आज ठरणार बाजी कोणाची….!

Patil_p

युवासेनेच्या कार्याची प्रशंसा

Amit Kulkarni
error: Content is protected !!