तरुण भारत

सोमवारी 232 नवे रुग्ण तर 182 जण झाले बरे

सक्रिय रुग्णसंख्या 2200 वर : स्वॅब तपासणी प्रक्रिया वाढविली

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

सोमवारी जिह्यात 232 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकूण बाधितांच्या संख्येने 31 हजारांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 182 जण कोरोनामुक्त झाले असून वेगवेगळय़ा इस्पितळांतून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 199 वर पोहोचली आहे.

सोमवारी बेळगाव शहर व उपनगरांतील 47 व तालुक्मयातील 16 अशा 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गोकाक तालुक्मयातील 24, रायबाग तालुक्मयातील 28, खानापूर तालुक्मयातील 23, अथणी तालुक्मयातील 16, रामदुर्ग तालुक्मयातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब तपासणी वाढविण्यात आली आहे. अद्याप 12 हजार 227 जणांचे अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 28 हजार 299 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अद्याप 47 हजार 228 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

गणेशपूर, मुत्नाळ, होनिहाळ, हुंचेनहट्टी, कंग्राळी खुर्द, खादरवाडी, सांबरा, मच्छे, विजयनगर, हिंडलगा, हिंदवाडी, रामतीर्थनगर, भाग्यनगर, बिम्स क्वॉर्टर्स, फोर्ट रोड, हनुमाननगर, जाधवनगर, कणबर्गी, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, महांतेशनगर, महाद्वार रोड, सदाशिवनगर, सह्याद्रीनगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

याबरोबरच बोरगाव, मदभावी, नंदगाव, संकोनट्टी, सिद्धेवाडी, चमकेरी, अथणी, बैलहोंगल, सिंधीकुरबेट, गोकाक, रामदुर्ग, यरगट्टी, डिग्गेवाडी, घटप्रभा, गोटूर, रायबाग, हुक्केरी, हंचिनाळ, होसकोटी, इनाम होंगल, जकबाळ, कमकेरी, हलशी, चिकोडी, नागरमुनवळ्ळी, शेडबाळ, मंगावती, सालहळ्ळी, संकेश्वर, सौंदत्ती, कणकुंबी, परिसरातही सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी आतापासूनच सज्ज रहा

Amit Kulkarni

18 दिवसात 3 हजार 500 जणांचा विमान प्रवास

Patil_p

पावसाची सर्वत्र दमदार हजेरी

Patil_p

धामणे मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश-धान्य वाटप

Patil_p

होतकरू क्रिकेटपटूंना बेळगावात संधी उपलब्ध करून देणार

Amit Kulkarni

कर्नाटक: रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या आहारात केले बदल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!