तरुण भारत

दिलासा! छत्तीसगडच्या जिंदाल स्टील प्लान्टहून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दिल्लीत दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


देशात कोरोना विषाणू धुमाकूळ घालत आहे. त्यातच राजधानी दिल्लीत भयानक परिस्थिती दिसून येत आहे.  दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी मोठ्या गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागते आहे. दररोज समोर येणाऱ्या रुग्णांचा आकडा भीतीदायक आहे. त्यासोबत दररोज होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यातही गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. 

Advertisements


दिलासा देणारी बाब म्हणजे दिल्लीत अजूनही बेडसची संख्या आणि ऑक्सिजनचे संकट कायम असताना सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली आहे. छत्तीसगडच्या जिंदाल स्टील प्लान्टहून ऑक्सिजनचे चार मोठे कंटेनर्स घेऊन ही ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दिल्लीत दाखल झाली आहे. 


आज सकाळी मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, दिल्लीतील रुग्णालयांत सद्य स्थितीत केवळ 12 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. तर ऑक्सिजन बेडची संख्या 1727 आहे.


दरम्यान, मागील 24 तासात दिल्लीत 20,201 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 380 जणांचा मृत्यू झाला. सद्य स्थितीत राजधानीत 92 हजार 358 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर रुग्णांचा एकूण आकडा 10 लाख 47 हजार 916 वर पोहचला असून यातील 9,40,930 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 14,628 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदासाठी ‘ही’ नावे चर्चेत

datta jadhav

अण्णाद्रमुक नेते पांडियन यांचे निधन

Patil_p

लष्कराचा गणवेश घातलेल्या संशयितास मेरठमध्ये अटक

datta jadhav

उत्तराखंडात 496 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

देशात 34,703 नवे बाधित

datta jadhav

भारताच्या साहाय्यासाठी अमेरिकेची धडक मोहीम

Patil_p
error: Content is protected !!