तरुण भारत

कर्नाटक : सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करणार नाही

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटक सरकार सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन कपात करणार असल्याची कोणतीही योजना नाही. सोमवारपासून सोशल मीडियावर अशी चर्चा केली जात आहे की सरकार सर्व सरकारी कर्मचार्‍यांचा एका महिन्याचा पगार रोखण्याचा विचार करीत आहे, परंतु कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या माहितीनुसार ही अफवा असून असा कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याचे म्हंटले आहे.

सोशल मीडियावर अफवा पसरविल्या नंतर संघटनांचे अध्यक्ष सी. एस. शादक्षरी म्हणाले की राज्य सरकार असे निर्णय घेण्याआधी सहसा कर्मचारी संघटनेचा सल्ला घेते.

असोसिएशनच्या अधिकृत निवेदनात असे लिहिले आहे की, “आजपर्यंत अशा प्रकारची चर्चा झालेली नाही. ही केवळ अफवा आहे. असोसिएशनने कर्मचार्‍यांना त्याकडे लक्ष न देण्याची विनंती केली आहे,” असे असोसिएशनच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

कर्जफेडीतून तीन महिने मुक्तता शक्मय

tarunbharat

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

datta jadhav

महाराष्ट्रात मागील 24 तासात 116 पोलिसांना कोरोनाची बाधा 

pradnya p

पुण्यातील कोरोना संक्रमणाचा वेग देशात सर्वाधिक

prashant_c

गोवंशहत्येमुळे भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक भावना दुखावल्या जातात: सुधाकर

Shankar_P

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

pradnya p
error: Content is protected !!