तरुण भारत

भारताच्या मदतीसाठी सरसावल्या अमेरिकेतील 40 कंपन्या

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

भारताला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक देश पुढे येत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर अमेरिकेतील 40 कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही (सीईओ) एकजुटीचे उत्तम उदाहरण देत भारताच्या मदतीसाठी जागतिक टास्क फोर्सची स्थापना केली आहे. 

Advertisements

डेलॉइटचे सीईओ पुनीत रंजन म्हणाले की, यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल आणि यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमच्या बैठकीत पुढील काही आठवड्यांत भारतात 20,000 ऑक्सिजन मशीन  पाठविण्याचा एकमताने निर्णय झाला. या सामूहिक उपक्रमाचा एक भाग म्हणून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. साथीच्या रोगांसाठी तयार करण्यात ही जागतिक टास्क फोर्स भारताला वैद्यकीय साहित्य, कोरोना प्रतिबंधक लस आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मदत करेल. 

Related Stories

अमेरिका : संक्रमण तीव्र

Omkar B

फिनलंड पंतप्रधानांच्या महागडय़ा नाश्त्याची चर्चा

Amit Kulkarni

इटलीत आता कोरोना प्रमाणपत्राशिवाय नाही प्रवेश

Patil_p

लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगात

datta jadhav

81 वर्षीय वृद्धेने पूर्ण केली मड रेस

Patil_p

फायझर-बायोएनटेक कंपन्यांवर सायबर हल्ला

datta jadhav
error: Content is protected !!