तरुण भारत

फोन टॅपिंग प्रकरण रश्मी शुक्लांना मुंबई पोलिसांकडून समन्स

मुंबई \ ऑनलाईन टीम

राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांन समन्स पाठवले आहे. २०१९ च्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये मुंबईतील सायबर पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात हे समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांना बुधवारी उपस्थित राहण्यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत.

भारतीय टेलिग्राफी अॅक्ट कलम ३०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३ व ४६ तसेच ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट ०५ अन्वये रश्मी शुक्ला यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. बुधवार दि. २८ एप्रिल रोजी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले आहे. रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत. हैदराबाद येथे त्या कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना काही व्यक्तींच्या नावे फोन टॅपिंगची परवानगी घेऊन भलत्याच व्यक्तींचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप केले होते व या फोन टॅपिंगचा अहवाल लीक केला गेला असा खळबळजनक आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या लीक अहवालाचा आधार घेत पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच या प्रकरणी चौकशी व्हावी अशी विनंती काही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती

Advertisements

Related Stories

राज्याला मुख्यमंत्री तरी आहेत का ?- चंद्रकांतदादा पाटील

Sumit Tambekar

सातारा शहराला दोन दिवस पाणी पुरवठा होणार नाही

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 3 लाख 2 हजार 758 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

कांदा, बटाटा, डाळी, खाद्यतेल जीवनावश्यक नाही!

datta jadhav

महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घरात बसून देण्यास राज्यपालांची परवानगी : उदय सामंत

Rohan_P

सातारा जिल्ह्यात 62 जण कोरोनामुक्त दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!