तरुण भारत

प्रतिक्षा संपली : रशियाची ‘स्पुतनिक-व्ही’ लस 1 मे ला भारतात

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला भारतात मंजुरी दिली आहे. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात दाखल होणार आहे. रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रिक यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

Advertisements

दिमित्रिक म्हणाले, रशियाने भारताला लस पुरवठा करण्यासाठी करार केला आहे. त्यानुसार 50 दशलक्ष डोस येत्या काही दिवसात भारताला दिले जातील. भारताला या लसीचे एकूण 8.5 कोटी डोस मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’चे लसीकरण सुरू आहे. आता ‘स्पुतनिक-व्ही’ ची पहिली खेप भारतात दाखल झाल्यानंतर लसीकरणाला गती मिळणार आहे. रशियाची ही लस गॅमलेया रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थांनी मिळून तयार केली आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे. 

Related Stories

… म्हणून संतापलेल्या किम जोंग उन यांनी तोडले दक्षिण कोरियाशी संबंध

datta jadhav

कोविड महामारीनंतर बदलला मेन्यू

Patil_p

युरोपात नोव्हेंबरमध्येच आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण

datta jadhav

अफगाणिस्तानसंबंधी अमेरिका, ब्रिटनचा नवा इशारा

Patil_p

संयुक्तराष्ट्र सुरक्षा मंडळावर भारताला सदस्यत्व

datta jadhav

न्यूझीलंडमध्ये पुन्हा निर्बंध

datta jadhav
error: Content is protected !!