तरुण भारत

पुणे : दत्तचरणी दवणा वनस्पतीची मनोहारी आरास

  • हनुमान जन्मोत्सवाच्यानिमित्त आयोजन

ऑनलाईन टीम / पुणे :

तापांचे दमन करण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने वापरल्या जाणा-या दवणा या वनस्पतीची मनोहारी आरास दत्तमहाराजांच्या चरणी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आली. दवणा ही औषधी वनस्पती असल्याने लवकरात लवकर कोरोना महामारी समूळ नष्ट होऊ देत, अशी प्रार्थना या वनस्पतीची आरास करुन करण्यात आली. 

Advertisements


बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात दवणा वनस्पतीची आरास करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. 


चैत्र पौर्णिमेनिमित्त श्री दत्तयाग आरती मंडळाचे महेश ठोंबरे, प्राजक्ता ठोंबरे यांच्या हस्ते दत्तयाग पार पडला. माध्यान्य आरती देणगीदार विलास केंजळे व कुटुंबिय यांच्या हस्ते झाली. यावेळी प्रख्यात ह्रदयरोगतज्ञ डॉ.ॠतुपर्ण शिंदे देखील उपस्थित होते. दवण्याची आरास करताना विविधरंगी सुगंधित फुले लावण्यात आली होती. दत्तमहाराजांना दवण्याचा हार घालण्यात आला. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही आरास केली. 


सुनिल रुकारी म्हणाले, तापांचे दमन करण्यासाठी आणि उन्हाळ्यामध्ये याचा वापर होत असल्याने दवणा वनस्पतीला वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे मंदिरात या वनस्पतीची आरास करुन कोरोनामुक्त भारत व संपूर्ण जग होवो, अशी प्रार्थना आम्ही करीत आहोत. 


डॉ.पराग काळकर म्हणाले, मूळ संस्कृत दमना नाव असलेली औषधी वनस्पती मूळची काश्मिरमधील हिमालयातील आहे. नावाप्रमाणे वात, पित्त, कफ या त्रिदोषाचे दमन करणी ही वनस्पती औषधी आहे. तसेच ही वनस्पती सुवासिक देखील आहे.

Related Stories

करवंटीपासून साकारु नाना शोभेच्या वस्तू

Omkar B

माळशेजघाट येथे 10 जानेवारीपासून ‘माळशेज पतंग महोत्सव’

prashant_c

गुढीपाडव्यापासून सुरु होणारा ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव यंदा रद्द

Rohan_P

शिक्षक दिनानिमित्त गूगलचे खास डूडल…

Rohan_P

आधी लस, नंतर वरात

Patil_p

भूगर्भात सातत्याने बाहेर येतेय पाणी

Patil_p
error: Content is protected !!