तरुण भारत

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तिथीनुसार शिवपुण्यतिथी गांभीर्याने

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुसार शिवपुण्यतिथी गांभीर्याने पाळण्यात आली आणि महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता शिवाजी उद्यान येथे शिवमूर्तीला दुग्धाभिषेक करून  विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर किरण गावडे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून  महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी किरण गावडे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या युवापिढीने घ्यावा, असे सांगितले. याप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख किरण गावडे, विश्वनाथ पाटील, शंकर दादा भातकांडे, युवराज पाटील, गजानन निलजकर, अंकुश केसरकर, विजय कुंटे, राम सुतार, अमोल केसरकर, नितीन कुलकर्णी, ओमकार पुजारी, उदित रेगे, वैभव धामणेकर, मारुती पाटील यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

ममदापुरात दीपोत्सव भक्तिमय वातावरणात

Amit Kulkarni

युनिव्हर्सल ग्रुपतर्फे पोलिसांसाठी रेनकोट

Amit Kulkarni

कोरोनाकाळात उपचार देणाऱया डॉक्टरांचा सत्कार

Patil_p

शिक्षक बदली प्रक्रियेचे कौन्सिलिंग 16 डिसेंबरपासून

Patil_p

मालमत्ता फेरसर्वेक्षणाचे काम रखडले

Patil_p

डॉ. शिवबसव महास्वामीजींचा रविवारपासून जयंती महोत्सव

Amit Kulkarni
error: Content is protected !!