तरुण भारत

बेंगळूर: कोरोना तपासणी अहवाल आयसीएमआर पोर्टलवर अपलोड न केल्याने चार प्रयोगशाळांना नोटीस

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. तसेच जिल्ह्यात कोरोना तपासणी अहवाल देखील वेळाने मिळत आहेत. यातच आता बृह बेंगळूर महानगर पालिकेचे मुख्य आयुक्त गौरव गुप्ता यांनी आरटी-पीसीआर चाचणीनंतर कोरोना चाचणी अहवाल २४ तासानंतरही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) पोर्टलवर अपलोड न केल्याबद्दल प्रयोगशाळांना नोटीस पाठविली आहे. त्यामुळे संबंधित प्रयोगशाळांना ४८ तासाच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

राज्य सरकारच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल प्रयोगशाळाही सील करण्यात आल्या आहेत. यामध्ये मेडऑल लॅब, आरती स्कॅन आणि लॅब, आरव्ही लॅब आणि बीजीएस ग्लोबल मेडिकल कॉलेज लॅब यांचा समावेश आहे. कर्नाटक महामारी रोग अध्यादेश २०२० च्या कलम चार अंतर्गत केपीएमई नोंदणी देखील रद्द करण्यात आली आहे.

नोटीसनुसार बर्‍याच लोकांनी तक्रार केली आहे की लॅब आयसीएमआर पोर्टलवर अहवाल अपलोड न करताच रुग्णांना अहवाल देत आहेत. हे आयसीएमआर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. या प्रयोगशाळांना देण्यात आलेली मंजुरी मागे घेण्यासाठी बीबीएमपीने आयसीएमआरला देखील पत्र लिहिले आहे.

Advertisements

Related Stories

बेंगळूर-जपान थेट विमानसेवा सुरू

Amit Kulkarni

कर्नाटकात शुक्रवारी १,५२६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

बससेवा आज सुरू राहणार

Patil_p

सीबीआयची शिवकुमार यांना नोटीस

Patil_p

बलात्काऱ्याला शिक्षा काय? कर्नाटकातील महिला आमदार म्हणाल्या…

Abhijeet Shinde

चार महिन्यांपासून शाळा बंद, शिक्षणतज्ञांना शालेय शिक्षणात खंड पडण्याची भिती

Rohan_P
error: Content is protected !!