तरुण भारत

मतमोजणी प्रवेशावेळी कोरोना निगेटिव्ह अहवाल बंधनकारक

अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी एजंटांना सक्ती

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी 2 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत राणी पार्वती देवी महाविद्यालयामध्ये होणार आहे. या मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱयांना तसेच मतमोजणीसाठी येणाऱया एजंटांना कोरोना निगेटिव्ह अहवाल देणे बंधनकारक असल्याचे निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी सांगितले.

राज्य सरकारने कर्फ्यु जारी केल्यामुळे मतमोजणीसाठी येणाऱया अधिकाऱयांना, कर्मचाऱयांना आणि एजंटांना ओळखपत्रे दिली जाणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी केवळ कर्मचाऱयांच्या वाहनांनाच परवानगी दिली जाणार आहे. पार्किंगची जागा नियुक्त करण्यात आलेल्या ठिकाणीच पार्किंग करावे लागणार आहे. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर एस. यांनी केले आहे.

कोरोनाचे नियम पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दिलेल्या मार्गसूचीनुसारच काम करावे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related Stories

राज्योत्सवानिमित्त विविध ठिकाणी कमानी उभारण्यास सुरुवात

Amit Kulkarni

गुंजीत आखेर स्वयंघोषित सीलडाऊन, गावातील सर्वच रस्ते बंद

Patil_p

तब्बल 15 दिवसांनी स्वॅब अहवाल उपलब्ध

Omkar B

कोरोनावरील लस घेण्यास योद्धे अनुत्सुक

Amit Kulkarni

पुढील आठवडय़ात केवळ 3 दिवस बँका राहणार सुरू

Patil_p

विजापूरकडे धावणाऱया बसेस उगार, ऐनापूर मार्गे सोडाव्यात

Patil_p
error: Content is protected !!