तरुण भारत

पंजाबमध्ये मागील 24 तासात 100 जणांचा मृत्यू; 5,932 नवे कोरोना रुग्ण

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील रुग्णांनी 3.51 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात तब्बल 5 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. काल 5,932 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 100 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 282 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या दिवशी 3774 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 लाख 51 हजार 282 रुग्णांपैकी 2 लाख 90 हजार 716 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 8 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 70 लाख 54 हजार 436 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 57,546 टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या. सद्य स्थितीत 51 हजार 936 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 677 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 83 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 

Related Stories

चर्चेसाठी ‘तारीख पे तारीख’

Patil_p

जेएनयुचा वादग्रस्त विद्यार्थी शरजीला अटक

Patil_p

कोरोना नियमांचे उल्लंघन; सपाच्या 2500 कार्यकर्त्यांवर गुन्हा

datta jadhav

21 एप्रिलपर्यंत मिळणार 21 राफेल विमाने

Omkar B

पंजाबमधील रुग्णांनी ओलांडला 2.45 लाखांचा टप्पा

Rohan_P

होलिकोत्सवात सावधानता बाळगा!

Patil_p
error: Content is protected !!