तरुण भारत

सॅमसंगचा ‘एम-42’ 5-जी स्मार्टफोन बाजारात दाखल

नवी दिल्ली 

 सॅमसंगने भारतामध्ये आपला गॅलक्सी एम 42 5-जी सुविधा असणारा स्मार्टफोन नुकताच सादर केला आहे. सदरचा स्मार्टफोन हा मिडरेंजमधील असून यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रगन 750 जी प्रोसेसरसोबत येणार आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तसेच वॉटरड्रॉप स्टाईल नॉच ऍमोलेड डिस्प्लेची सुविधा देण्यात आल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे .

Advertisements

सादर करण्यात आल्याच्या सवलत योजनेनुसार सदरचा स्मार्टफोन हा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह येणार असून त्याची किमत ही 19,999 रुपये असून यातील दुसऱया 8 जीबी रॅम असणाऱया व 128 जीबी स्टोरेज असणाऱया स्मार्टफोनची किमत ही 21,999 रुपये राहणार असल्याचेही कंपीनीने स्पष्ट केले आहे.

मजबूत बॅटरीची सुविधा

सॅमसंग गॅलक्सी एम 42 5 जी फोनला 5,000 एमएएच क्षमता असणारी बॅटरी मिळणार आहे. तसेच 15 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्ट असल्याचाही दावा कंपनीने केला आहे. सिंगल चार्जमध्ये 36 तासापर्यंत मोबाईल सुरु राहणार असल्याचेही म्हटले आहे.

Related Stories

ओप्पोचा फोल्डेबल फोन डिसेंबरमध्ये

Patil_p

सॅमसंग ए 51 ची विक्री 60 लाखावर

Patil_p

एमआय 10 आय आज होणार दाखल ?

Patil_p

देशात आयफोन-13 च्या निर्मितीला प्राधान्य

Patil_p

टेंडाकडून ‘पॉकेट मोबाईल वायफाय’ उपकरण सादर

Patil_p

एमआय 11 लाइट स्मार्टफोन लाँच

Amit Kulkarni
error: Content is protected !!