तरुण भारत

सुवर्णा माने यांची पदोन्नती; बनल्या राज्यातील पहिल्या महिला आयएफएस

प्रतिनिधी / सोलापूर

सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची बुधवारी राज्यसेवेतून केंद्रीय वन सेवेत पदोन्नती झाली. राज्यसेवेतून वनविभागात आयएफएस होणाऱया त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. आता त्यांची पदोन्नतीने अहमदनगर येथे वन विभागाच्या उपवनसंरक्षक पदावर बदली झाली आहे.

सुवर्णा माने या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून वन विभागात दाखल झाल्या. आजवर त्यांनी सोलापूर वन विभागात सहायक वनसंरक्षक, लातूर येथे विभागीय वनअधिकारी, सोलापूर येथे विभागीय वन अधिकारी पदावर सेवा बजावली आहे. आता त्यांची पदोन्नती झाली आहे.

Advertisements

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय वन सेवा या तीन अखिल भारतीय सेवेमध्ये सरळसेवेने व राज्यसेवेतून पदोन्नतीने अधिकाऱयांची नियुक्ती केली जाते. त्यात भारतीय वनसेवेत सुवर्णा माने यांची निवड झाली आहे.

सुवर्णा माने या मूळच्या करमाळा तालुक्मयातील वशिंबे गावच्या आहेत. त्यांचे सासर वैराग (ता. बार्शी) आहे. त्यांचे पती रविंद्र माने हे सध्या प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी या पदावर सोलापूर येथे कार्यरत आहेत.

यापूर्वी राज्यात वनविभागात विविध पदावर महिला अधिकाऱयांनी काम केले आहे परंतू राज्यसेवेतून आयएफएस होणाऱया सुवर्णा माने झोळ या पहिल्या महिला अधिकारी आहेत. वनविभागात आजपर्यंत वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल या पदावर महिलांनी काम केले होते परंतु 2009 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पहिल्यांदाच सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग 1 च्या पदावर 8 महिला व 25 पुरुषांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या तुकडीतील 6 अधिकारी भारतीय वनसेवेत दाखल झाले आहेत. त्यात सुवर्णा माने या एकमेव महिला अधिकारी असून राज्यसेवेतून केंद्रीय वन सेवेत जाणाऱया राज्यातील त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले
गेल्या चार-पाच वर्षात सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून सोलापूर जिह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांचे सहकार्य मिळाले. आयएफएस सेवा मिळाल्याचा आनंद आहे.

  • सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाचे 9 बळी, 146 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

स्वराविष्कारात रंगला ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे समारोह’

prashant_c

सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यातील सरपंच निवडी लांबणीवर

Abhijeet Shinde

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी केंद्रांवर रवाना

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीनजीक बस पेटवल्याप्रकरणी चौघे अटकेत

Abhijeet Shinde

सोलापूर : अवकाळी पावसामुळे 83.25 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!