तरुण भारत

माद्रिद ओपनमधून जोकोविचची माघार

वृत्तसंस्था/ माद्रिद

जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने पुढील आठवडय़ात होणाऱया माद्रिद ओपन एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेतून माघार घेतली असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

Advertisements

33 वर्षीय जोकोविच हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून गेल्या आठवडय़ात सर्बिया ओपनमध्ये तो शेवटचा खेळताना दिसला होता. त्या स्पर्धेत उपांत्य फेरीतच त्याला रशियाच्या असलन कारात्सेव्हकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ‘या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही, त्याबद्दल सॉरी. या स्पर्धेत खेळून दोन वर्षे म्हणजे बराच कालावधी झाला आहे,’ असा त्याने पाठविलेला संदेश आयोजकांनी दाखविला. मागील वर्षी ही स्पर्धा कोव्हिड 19 च्या प्रकोपामुळे रद्द करण्यात आली होती तर 2019 मध्ये जोकोविचने जेतेपद मिळविले होते. पुढील महिन्यात रोम मास्टर्स व बेलग्रेड ओपन स्पर्धा होणार आहेत, त्यात तो सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर लंकन फिरकीपटूंचे आव्हान

Patil_p

अमित पांघल उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

संजय बांगर आरसीबीचे नवे फलंदाज सल्लागार

Patil_p

भारत-अर्जेन्टिना पहिली हॉकी लढत आज

Patil_p

निकोलसचा शेवटच्या चेंडूवर विजयी षटकार!

Patil_p

शेवटच्या चेंडूवर शमले दिल्लीचे वादळ!

Patil_p
error: Content is protected !!