तरुण भारत

दापोलीकरांच्या पुढाकारातून कोरोना लसीकरण केंद्र

मनोज पवार/ दापोली

दापोली उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाबाबत दररोज होणारा गोंधळ व अनियमितता टाळण्यासाठी व आरोग्य विभागाचे काम सुखकर करण्यासाठी आता दापोलीकरांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी दापोलीतील जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन दापोली शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिर येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली नवीन लसीकरण केंद्र सुरू केले आहे. हा राज्यातील राज्यातील नागरिकांनी एकत्र येऊन लसीकरण केंद्र सुरू करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने दापोलीतील नागरिकांचे कौतुक होत आहे.

Advertisements

दापोली उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण केंद्रावर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा लागत होत्या. यानंतर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आल्यानंतर लस शिल्लक आहे अथवा नाही हे पहाटेपासून रांगेत उभे राहिलेल्या वयोवृद्ध नागरिकांना समजत होते. लस शिल्लक असली तर त्या दिवशीच्या कोटय़ाप्रमाणे लस देण्यात येत होती व लस उपलब्ध नसेल तर नागरिकांना माघारी पाठविण्यात येत होते. यामुळे प्रचंड असंतोष निर्माण होऊन दररोज गदारोळात प्रसंग व उपजिल्हा रुग्णालयाला अनुभवायला लागत होता.

  यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून दापोलीतील समीर गांधी, बाळू भळगट, संतोष विचारे, धनंजय गोरे, विपुल पटोलिया, हरेश पटेल, दीपक हर्डीकर, संदीप बागायतकर, प्रसाद फाटक, सुरेश केळकर, प्रकाश बेर्डे, महादेव काळे, विजयसिंह पवार, ऋषिकेश ओक, करिष्मा भुवड, स्नेहल जाधव, गौरव करमरकर, सुमेध करमरकर या सर्वांनी एकत्र येऊन दापोली शिक्षण संस्थेच्या कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू केले आहे.

  येथे आठ ते एक या वेळेत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. येथे एक साधा सुटसुटीत फॉर्म भरून तो लसीकरण इच्छुक व्यक्तीने एका खोक्यांमध्ये टाकायचा आहे. हे खोक्यात झालेले अर्ज जमा करून ते पाधान्यक्रमाप्रमाणे वेगवेगळे करण्यात येणार आहेत. लस उपलब्ध झाल्यावर ज्यांना दुसरा डोस देण्याची मुदत संपत आलेली आहे अशांना प्राधान्यक्रमाने लसीकरणासाठी कळवण्यात येणार आहे. यानंतर प्रथम डोस वाल्यांना कळवण्यात येणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर एका सॉफ्टवेअरमध्ये ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्म भरणाऱया व्यक्तीला एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. यामुळे पहाटेपासून उपजिल्हा रुग्णालयात रांगा लावणाया लोकांना आता केवळ एक फॉर्म भरून घरी निवांत बसणे शक्य होणार आहे. घरी निवांत बसून एसएमएस आल्यानंतर त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये दापोली शिक्षण संस्थेच्या टेलिफोन एक्सचेंज कार्यालया समोर येऊन आपले लसीकरण पूर्ण करायचे आहे अशी माहिती उपजिल्हा रूग्णालयातील अधीक्षक  डॉ. महेश भागवत यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. हे.

Related Stories

पालकमंत्र्यांनी घडविला समन्वय

NIKHIL_N

रत्नागिरी : दापोलीच्या तापमानात चढ उतार

Abhijeet Shinde

हवेच्या आर्दतेत 15 ते 20 टक्क्यांची घट

NIKHIL_N

जनहितार्थ निर्णयांना सेना नगरसेवकांची नेहमीच नकारघंटा!

Omkar B

सर्वोच्च निकालासह सिंधुदुर्ग ‘टॉप’वर

NIKHIL_N

युरोप वारीसाठी हापूस सज्ज खाजगी विमानाचा होणार वापर

Patil_p
error: Content is protected !!