तरुण भारत

कामगारांनी धरला परतीचा मार्ग

70 टक्के कामगार माघारी

प्रतिनिधी / मडगाव

Advertisements

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर काल असंख्य कामगारांनी पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी परतीचा मार्ग धरला. रेल्वे मार्गे पुन्हा गावी जाण्यासाठी कामगारांनी काल बुधवारी मडगाव रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती. सरकारने जरी चार दिवस लॉकडाऊनची घोषणा केली तरी कामगार या ठिकाणी थांबण्यास राजी नव्हते. जवळपास 70 टक्के कामगारांनी परतीचा मार्ग धरल्याची माहिती उशिरा हाती आली होती. कामगार परत जाऊ लागल्याने त्याचा जबरदस्त परिणाम येथील बांधकामांवर तसेच इतर कामांवर होण्याची शक्यता आहे.

गोव्यात शेजारील कर्नाटक, महाराष्ट्र तसेच छत्तीसगड, बिहार, उत्तराखंड, ओडिशा या राज्यातून कामगार येत असतात. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात अशाच पद्धतीने हजारो कामगार पुन्हा आपल्या गावी गेले होते. सरकारने त्यांच्यासाठी खास रेलगाडय़ाची व्यवस्था केली होती. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हळूहळू पुन्हा कामगार वर्गाने गोव्यात येणे पसंत केले होते.

गेल्या वर्षाच्या तुलनेत कोरोना महामारीने यंदा सर्व राज्यांना जबरदस्त दणका दिलेला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे. गोव्यात सुद्धा कोरोनाचा कहर झालेला असल्याने कामगार वर्गात भीती असल्याने त्यांनी परतीचा मार्ग धरला आहे.

कामगार थांबण्यास राजी नाही

हे कामगार ज्या ठिकाणी काम करीत होते, त्या ठिकाणी त्यांना थांबण्याचे आवाहन मालकांनी केले तरी ते थांबण्यास राजी नव्हते. काही मालकांनी कोकण रेल्वे स्थानकावर येऊन या कामगारांची समजूत घालून त्यांना थांबण्याचे आवाहन केले तरी कामगार काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना घरच्या लोकांची काळजी लागून गेली होती. सरकारने केवळ चार दिवसांसाठीच लॉकडाऊन घोषित केला असला तरी हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता सर्वानाच वाटत आहे. गोव्यात मोठय़ा संख्येने कोरोनाचे संक्रमण झाल्याने लॉकडाऊन वाढविला जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे देखील कामगार या ठिकाणी थांबण्यास राजी नाहीत.

बांधकाम लांबणीवर पडणे म्हणजे बिल्डराला फटका बसतो, सर्व आवश्यक वस्तू महाग होत असतात. त्यात कामगारांकडून पगार वाढीची मागणी होऊ लागल्याने उद्या बिल्डरांना आपले फ्लॅट किंवा बंगले महागडय़ादरानेच विक्री करावे लागणार असल्याकडे बिल्डर्सनी लक्ष वेधले.

बांधकामांवर परिणाम होण्याची शक्यता

सद्या सरकारने लॉकडाऊनच्या काळात बांधकामांवर कोणतीच बंधने घातलेली नाहीत. बांधकामे चालू आहेत. परंतु कामगार परत जात असल्याने त्याच्यावर परिणाम होण्याची भीती मडगावचे बिल्डर डॉ. देश प्रभुदेसाई यांनी व्यक्त केली आहे. मागच्या लॉकडाऊनच्या काळात कामगार परत गेले व पुन्हा आल्यावर त्यांनी आपल्या पगारात वाढ करून मागितली. त्याप्रमाणे पगारवाढ द्यावी लागली. आत्ता हे कामगार पुन्हा जात आहेत. ते परत आल्यानतंर पुन्हा पगारवाढीची मागणी केली तर बांधकाम क्षेत्रात असलेल्यांनी काय करावे असा सवाल उपस्थितीत होत असल्याचे डॉ. प्रभुदेसाई म्हणाले.

Related Stories

राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची जागृती फिरत्या वाहनावरून थेट दारात

Amit Kulkarni

समुद्रातील तापमान वाढीस ग्रीनहाऊस वायू कारणीभूत

Amit Kulkarni

सांखळीत 21कोरोना रूग्ण सापडले ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात

Patil_p

डिचोलीत भाजपकडून उमेदवारासाठी प्रयत्नांची शिकस्त

Amit Kulkarni

मुस्लीमवाडा, नागझर डिचोली येथे बेकायदा गोमांस जप्त

Omkar B

पत्रकारिता नोकरी, व्यवसाय नसून ते सेवाव्रत : सुधीर कांदोळकर

Amit Kulkarni
error: Content is protected !!