तरुण भारत

गीतरामायणातील काव्यरचनांचे सुरेल सादरीकरण

संस्कार भारती संस्थेतर्फे गजानन महाराज मंदिरात कार्यक्रम

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

गीतरामायण म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संचित होय. आजही त्याची मोहिनी रसिकांवर चिरंतन आहे. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि सीताकांत लाड या त्रिमूर्तींच्या कल्पनेतून गीतरामायण महाकाव्य साकारले. याच गीतरामायणातील निवडक काव्य रचनांचे सुरेल सादरीकरण श्रीधर कुलकर्णी व अनुष्का आपटे यांनी केले.

संस्कार भारती संस्थेतर्फे मंगळवारी गजानन महाराज मंदिर येथे कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून मोजक्मयाच व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्याचे फेसबुकवरून प्रसारण करण्यात आले. प्रारंभी अध्यक्षा डॉ. नीता देशपांडे यांनी स्वागत केले. त्यानंतर नीना जठार यांच्या निवेदनाला अनुरुप गीते गायकांनी सादर
केली.

कुश-लव खुद्द आपल्या वडिलांच्या पराक्रमाची थोरवी गायनातून सांगतात. ते गीत म्हणजे ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश-लव रामायण गाती’ हे गीत गाऊन अनुष्काने प्रारंभ केला. त्यानंतर श्रीधर कुलकर्णी यांनी ‘दशरथा घे हे पायसदान’ हे गीत सादर केले. राम जन्माने अयोध्येला आनंदाचे उधाण आले आणि राम जन्माचे ‘राम जन्मला’ हे गीत श्रीधर यांनी सादर केले.

तसेच त्यांनी ‘दैवजात दुःखे भरता’, नकोस नौके परत फिरू ग’, ‘लीनते चारूते सीते’, ‘स्वामिनी निरंतर माझी व गा बाळांनो श्रीरामायण’, ही गीते सादर केली. अनुष्काने आज मी शापमुक्त झाले, निरोप कसला माझा घेता, कोण तू कुठला राजकुमार, धन्य मी शबरी श्रीराम’, मज सांग लक्ष्मणा ही गीते सादर केली. राम जन्मला, स्वयंवर झाले सीतेचे, सेतू बांधा रे भूवरी, रावण वध झाला ही गीते दोघांनी मिळून सादर केली.

त्यांना तबल्यावर संतोष संजीव-कुलकर्णी यांनी व संवादिनीवर रविंद्र माने यांनी साथ केली. टाळांची साथ संजीव कुलकर्णी यांनी केली. योगेश रामदास यांनी ध्येयगीत सादर करून आभार मानले. सूत्रसंचालन प्राजक्ता बेडेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी वैभव गाडगीळ यांनी पुढाकार
घेतला.

Related Stories

कंग्राळी बुदुक येथे डुकरांच्या कळपांचा आता शेतवडीत शिरकाव

Omkar B

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या

Amit Kulkarni

राज्योत्सवासाठी शहरातील विविध चौकांत कमानी-रोषणाई

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयातर्फे आज ‘त्या तिघी’चा एकपात्री प्रयोग

Patil_p

कुडचीत कोरोनाचा हाहाकार

Patil_p

हॉलमार्कची सक्ती, पारंपरिक सुवर्णकारांना धास्ती

Amit Kulkarni
error: Content is protected !!