तरुण भारत

नागेश चौगुले यांचा सन्मान

बेळगाव : आपल्या निवृत्तीनंतर आपण समाजासाठी काही तरी उपयुक्त काम करावे हे भान ठेवून गेली 22 वर्षे शांताई वृद्धाश्रमामध्ये कार्यरत असलेले नागेश चौगुले यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त शांताई वृद्धाश्रम येथे समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती नागेश चौगुले यांच्या समवेत माजी महापौर विजय मोरे, मारिया मोरे, लोकमान्य संस्थेच्या मालिनी बाली, लोकमान्यचे पीआरओ राजू नाईक उपस्थित होते. प्रारंभी शांताई वृद्धाश्रमचे संचालक संतोष ममदापूर यांनी स्वागत केले. माजी महापौर व शांताई वृद्धाश्रमचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी नागेश चौगुले यांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांचे अभीष्टचिंतन केले. लोकमान्य संस्थेतर्फे राजू नाईक यांनी शाल व पुष्पगुच्छ दिले. मालिनी बाली यांनी स्मृतिचिन्ह दिले. सत्काराला उत्तर देताना नागेश चौगुले यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडल्यावर प्रत्येकांनी समाजाची व देशाची सेवा करावी. शांताईने मला दिलेल्या संधीने माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. मी माझे उर्वरित आयुष्य शांताईच्या विकासासाठी देणार आहे, असे सांगितले. याप्रसंगी शांताईचे संचालक वसंत बालिगा, मारिया मोरे, लोकमान्य संस्थेचे समन्वयक विनायक जाधव, वैष्णवी उच्चुकर व शांताई वृद्धाश्रमातील सर्व आजोबा व आजी उपस्थित होते.

Related Stories

बेकायदेशीर वाहतूक, कोटीची रक्कम जप्त

Patil_p

अखेर समांतर फंड वाटप करण्यास मंजुरी

Patil_p

काही भागात एक दिवस उशिरा पाणीपुरवठा

Amit Kulkarni

ग्राम पंचायत निवडणुकीतून सीमाप्रश्नाला बळकटी द्या

Patil_p

येळ्ळूर शेतकरी विकास कृषी पत्तीन सोसायटीचे कार्य कौतुकास्पद

Amit Kulkarni

सोमवारी ग्रामीण, उत्तर-दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार

Amit Kulkarni
error: Content is protected !!