तरुण भारत

डबल म्युटंट कोरोनावर स्टेरॉईड रामबाण

सध्या भारतात आणि इतर काही देशांमध्ये डबल म्युटंट कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सध्या उपलब्ध असणाऱया लसी त्यावर कितपत परिणामकारक ठरतात, यासंबंधी संशोधकांनाही शंका आहे. तथापि, या कोरोनाच्या उपचारासंबंधात ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी स्थिती असल्याचे काही संशोधकांचे मत आहे. केवळ दहा-बारा रुपयात मिळणाऱया विशिष्ट स्टेरॉईडच्या गोळय़ा या कोरोनाचा फुफ्फुसातला संसर्ग दूर करू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या रेमिडेसिविर हे इंजेक्शन कोरोनावरील हमखास उपाय म्हणून सांगितले जाते. त्यामुळे त्याचा काळाबाजार प्रचंड प्रमाणात होत असून खुल्या बाजारातील इंजेक्शने एकाएकी गायब झाली आहेत. रेमिडेसिविर हे जीवरक्षक औषध नाही. ते केवळ सौम्य कोरोनावरच प्रभावशाली ठरू शकते. असा खुलासा करण्यात आला असूनही काळाबाजार थांबलेला नाही.

अशा परिस्थितीत स्टेरॉईडचा उपयोग जास्त परिणामकारक ठरू शकतो. विशेष म्हणजे स्टेरॉईडच्या उपयोगाने गंभीर स्थितीतील रुग्णही वाचण्याची शक्मयता बळावते. स्टेरॉईड देत असताना ऑक्सिजनही व्यवस्था करून ठेवणे आवश्यक असते. या स्टेरॉईडची किंमत अगदी गरिबालासुद्धा परवडण्यासारखी आहे.

Advertisements

तथापि, कोणत्याही स्टेरॉईडचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुळीच करू नये. केवळ माहिती म्हणून स्टेरॉईडबद्दल संशोधकांनी काही गोष्टी प्रसारित केल्या आहेत. स्टेरॉईडचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याशिवाय केल्यास प्राणघातक दुष्परिणामही संभवू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. शेवटचा उपाय म्हणून अत्यवस्थ रुग्णाला जगण्याची एक संधी देण्यासाठी स्टेरॉईड प्रभावी ठरते, असे अनेक डॉक्टरांचे मत आहे. मात्र, स्वबळावर कधीही या उपायाचा अवलंब करू नये, असेही निक्षून सांगण्यात आले आहे.

Related Stories

कोरोना काळात काय टाळावे

Amit Kulkarni

पतंजली आज लाँच करणार कोरोनावरील औषध

datta jadhav

कच्चे दूध पिताय ?

Omkar B

वजननियंत्रणासाठी आसने

tarunbharat

हस्तोत्तानासनचे फायदे

Amit Kulkarni

वर्कआउट नंतर प्रोटीन खाताय

Amit Kulkarni
error: Content is protected !!