तरुण भारत

कडूलिंबाची एक गोळी कोरोनाला दूर ठेवी

कोरोनावरती आयुर्वेदिक औषधे शोधून काढण्यासंबंधीही मोठे संशोधन सध्या देशात सुरू आहे. कडूलिंबाच्या रसापासून बनविलेली गोळी अत्यंत गुणकारी ठरते, असे वैद्यकीय परीक्षणात (क्लिनिकल ट्रायल) दिसून आल्याचा दावा केला जात आहे. फरिदाबाद येथील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयात कडूलिंबावर प्रयोग होत असून कोरोनावर हा रस रामबाण ठरत असल्याचे दिसून येते.

कडूलिंबाचे कोणतेही साईडइफेक्ट नाहीत. या वनस्पतीत आणि तिच्या पानात मोठय़ा प्रमाणावर औषधी गुणधर्म आहेत, हे आधुनिक वैद्यकशास्त्र पंडितांनीही मान्य केले आहे. कडूलिंबापासून बनविलेली औषधे अनेक विकारांवर सध्या घेतली जात आहेत. हाच कडूलिंबाचा रस कोरोनावरही प्रभावी आणि अतिशय स्वस्त असा उपचार ठरू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. कडूलिंबाची गोळी लसीइतकीच परिणामकारक आहे, असे दिसून आले आहे. निरोगी व्यक्तीने सलग 28 दिवस कडूलिंबाची एक गोळी सकाळ व संध्याकाळ घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे संशोधनात आढळले आहे. संशोधनाचे प्राथमिक निष्कर्ष अत्यंत आशादायक असल्याने सखोल संशोधन करण्यात येत आहे. ते यशस्वी ठरल्यास भारतीयांना अत्यंत स्वस्त दरात अतिशय प्रभावी उपाय मिळेल, असे या वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र, संशोधन पूर्ण होऊन अंतिम निष्कर्ष प्रसिद्ध झाल्याखेरीज स्वतःच्या मताने कोरोनावर कडूलिंबाचा उपाय करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.

Advertisements

Related Stories

स्ट्रेस बॉलेचे आरोग्यलाभ

tarunbharat

व्याधी टॉन्सिल्सची

Omkar B

भ्रूणाच्या नाळेत ‘मायक्रोप्लास्टिक’

Omkar B

चेहऱ्यावर सूज येतोय

Amit Kulkarni

वजननियंत्रणासाठी आसने

tarunbharat

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीला सुरुवात

datta jadhav
error: Content is protected !!