तरुण भारत

महिलांच्या टी-20 चॅलेंज स्पर्धेवर साशंकतेचे सावट

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सध्या भारतात सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान बीसीसीआयने तीन संघामध्ये महिलांची टी-20 चॅलेंज स्पर्धा घेण्याचे ठरविले होते. दरम्यान देशातील कोरोना परिस्थिती चिंताजनक असून हवाई प्रवासावर निर्बंध घालण्यात आल्याने ही स्पर्धा होण्याची शक्यता दुरावली आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी सरावाची शिबीर आयोजित केले होते. दरम्यान या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडीजचे महिला क्रिकेटपटू हवाई प्रवासावर घातलेल्या निर्बंधामुळे सहभागी होवू शकणार नाहीत. गेल्यावर्षी देशातील कोरोना परिस्थितीमुळे आयपीएल स्पधां संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्यात आली होती पण याच कालावधीत महिलांची बिगबॅश लीग क्रिकेट स्पर्धा झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटूंना सहभागी होता आले नव्हते. भारतातील कोरोना परिस्थिती चिंताजनक होत असल्याने ही स्पर्धा भरविणे कठीण असल्याचे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी हवाई प्रवासावर निर्बंध घातले आहेत.

Advertisements

Related Stories

टेनिस स्पर्धेसाठी दोन हजार शौकिनांना परवानगी

Patil_p

फुटबॉल हंगामाला ब्रेक : लाखोंची उलाढाल ठप्प

Abhijeet Shinde

2026 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा केंद्रांची निवड लांबणीवर

Patil_p

सिंधुचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त

Patil_p

दुबई स्पर्धेतून बार्टीची माघार

Patil_p

जागतिक क्रमवारीत नीरज चोप्राची दुसऱ्या स्थानी झेप

Amit Kulkarni
error: Content is protected !!