तरुण भारत

मॅग्सन कार्लसन उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था / चेन्नई

नॉर्वेचा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने तैमूर रॅडजाबोव्हचा पराभव करून एक लाख डॉलर्स बक्षीस रकमेच्या न्यू इन क्लासिक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचप्रमाणे ऍरोनियन, हिकारु नाकामुरा, मॅमेद्यारोव्ह यांनीही शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले आहे.

Advertisements

कार्लसन जबरदस्त फॉर्ममध्ये असून पहिल्या डावात रॅडजाबोव्हने त्याला बरोबरीत रोखले होते. पण दुसऱया डावात कार्लसनने त्याचा बचाव सहज भेदून विजय साकारत आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीतील सर्व लढती निकाली ठरल्या. ऍरोनियनने वेस्ली सो याचा प्रतिकार मोडून काढून विजय मिळविला तर हिकारु नाकामुरा व शॅख्रियार मॅमेद्यारोव्ह यांनी पहिल्या डावात मिळविलेली आघाडी कायम राखत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले.

कार्लसनने दुसऱया डावात रॅडजाबोव्हविरुद्ध अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने दर्जेदार स्ट्रटेजिक खेळ केला आणि त्यापुढे तैमूरचा टिकाव लागला नाही. कार्लसनने अगदी सहज वियज मिळविला तर तैमूर स्वतःवरच खूप चिडल्याचे दिसून आले. अमेरिकेचा वेस्ली सो व ऍरोनियन यांच्यात दोन ड्रॉनंतर वेस्लीला विजयाची गरज होती. पण ऍरोनियनने त्याला तशी संधी दिली नाही. यातील पहिले दोन सामने ऍरोनियनने जिंकले होते. त्यामुळे त्याला उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली. नाकामुराने व्हिएतनामच्या वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियन लिएम क्वांग ली विरुद्ध पहिल्या दोन सामन्यांच्या लढतीत विजय मिळविल्यानंतर दुसऱया लढतीत लिएमला त्याने संधी दिली नाही. मॅमेद्यारोव्हने 17 वर्षीय युवा बुद्धिबळपटू अलिरेझा फिरोझावर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. उपांत्य फेरी गाठण्याची आपली पहिली वेळ असल्याचे यावेळी मॅमेद्यारोव्ह म्हणाला.

Related Stories

जेमिमा रॉड्रिग्जचे सलग दुसरे अर्धशतक

Patil_p

स्टुअर्ट ब्रॉडचा पाचशे बळींचा टप्पा

Patil_p

इंग्लंडच्या आर्चरची दुखापत पुन्हा चिघळली

Patil_p

फुटबॉल प्रशिक्षक स्टिमॅक यांच्या करारात वाढ

Patil_p

सरबज्योत सिंगला नेमबाजीत सुवर्ण

Patil_p

माजी स्पिनर चंद्रशेखर इस्पितळात

Patil_p
error: Content is protected !!