तरुण भारत

कोरोना मदतकार्यासाठी मंत्री एक वर्षाचे वेतन देणार

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यमंत्री मंडळाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एकीकडे खर्चचा ताण वाढत असताना राज्यातील मंत्री मदतीसाठी धावले आहेत. राज्यातील कोरोना मदत कार्यांसाठी एक वर्षाचे वेतन देण्याचे कर्नाटकच्या मंत्र्यांनी एकमताने ठरविले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कोविड-व्यवस्थापन आणि १४ दिवसांच्या कर्नाटकच्या ‘क्लोज डाऊन’ च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनांबरोबर झालेल्या बैठकीनंतर अशोक यांनी पत्रकारांना याविषयी माहिती दिली. कोविड मदतकार्यासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांनी एक वर्षाचा पगार देण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे महसूलमंत्री आर अशोक यांनी गुरुवारी सांगितले.

कोविड व्यवस्थापन आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आर. अशोक आणि मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी गुरुवारी जिल्हा अधिकार्‍यांशी चर्चा केल्यांनतर पत्रकारांशी बोलपाना त्यांनी बैठकती मंत्री मंडळाने एकमताने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील आमदारही देणार एक महिन्याचे मानधन
दरम्यान महाराष्ट्रातही गुरुवारी काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे मानधन मोफत लसीकरणाचा खर्च भागविण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले एक वर्षाचे मानधन कोविड खर्चासाठी देणार असल्याचे म्हंटले.

Advertisements

Related Stories

छत्तीसगड : 31 मे पर्यंत वाढवले लॉकडाऊन!

Rohan_P

”फडणवीस बोलतात त्यात तथ्य नाही, भास्कररावांनी घडलेलं रेकॉर्डवर आणलंय”

Abhijeet Shinde

भाजप मंत्री पोहोचले चक्क जीवंत जवानाच्या घरी श्रद्धांजली वाहण्यासाठी

Abhijeet Shinde

कर्नाटक : विधानपरिषदेच्या चार जागांसाठी ७१ टक्के मतदान

Abhijeet Shinde

मेड इन इंडिया रेल्वे इंजिन तयार

datta jadhav

‘टिकटॉक’चे मुख्यालय लंडनला हलविण्याचा कंपनीचा विचार

datta jadhav
error: Content is protected !!